21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriउमरे धरणामध्ये दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होईल, एवढेच पाणी शिल्लक

उमरे धरणामध्ये दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होईल, एवढेच पाणी शिल्लक

कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणामध्ये चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अचानक सोडण्यात आलेल्या पाण्याने अनेकांचे कपडे, भांडी वाहून गेली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

उमरे प्रादेशिक नळपाणी योजना या धरणामधून राबवली जात आहे. या पाणी योजनेतून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या नावाखाली चार दिवसांपूर्वी पाणी सोडल्याने आता धरणातील पाणी साठा अचानक कमी झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होईल, एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे असे सांगितले जात आहे. उमरे, कळंबस्ते, हाकरवणे, कोंडउमरे, फणसवणे, अंत्रवली, भीमनगर, मलदेवाडी, भेकरेवाडी आदी गावे या योजनेवर अवलंबून असून या गावांना पाण्यासाठी कोणताही पर्याय नाही, त्यामुळे जवळपास या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

चार दिवसांपूर्वी अचानक या धरणातून पाणी सोडण्यात आले. याबाबत नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. नदीपात्रामध्ये काही महिला कपडे धुवत होत्या तर काही मुले जवळपास पोहत होती. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने या महिलांनी पोहणाऱ्या मुलांना कसेतरी बाहेर ओढून काढल्याने मोठी दुर्घटना टळली. नाहीतर काहीही विपरीत घडण्याची शक्यता होती.

त्याचबरोबर धरणाची फर्शी भिंत, जेथून धरण भरल्यावर जादा पाण्याचा विसर्ग होतो ती पूर्णतः बाद झाली असून जागोजागी मोठी भगदाडे पडली आहेत. ही भिंत बाद झाल्याने पावसाळ्यापूर्वी या धरणाची डागडुगी न केल्यास पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून चिपळूण-तिवरे गावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. याबाबत कळंबस्ते गावचे ग्रा. पं. सदस्य दत्तप्रसाद प्रेमनाथ पाटील यांनी तसीलदार सुहास थोरात यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे. त्याचबरोबर या संदर्भात आमदार शेखर निकम यांनाही कळवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular