कोरोना काळाच्या दोन वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्या फक्त कागदोपत्री राहिल्या होत्या. सर्वच राज्य बंद असल्या करणाने बदलीची प्रक्रिया देखील बंद होती. शाळा, कॉलेज दोन वर्षामध्ये केवळ ऑनलाईन सुरु होत्या. त्यामुळे त्या काळामध्ये बदलीची प्रक्रिया पूर्णत: थंडावली होती. आणि कोरोना काळानंतर हि प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने त्यामध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यंदा प्रथमच ऑनलाइन पध्दतीने होणार आहेत. त्यासाठी नवे पोर्टल तयार केले जात आहे. मागील दीड-दोन महिन्यांत या पोर्टलचे काम ७० टक्क्यांपर्यंतच झाल्याने शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलै उजाडेल, अशी ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असते.
पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्याने त्यामध्ये कोणतीच पारदर्शकता नसल्याचा अनेकदा आरोप करण्यात आला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतलेला. कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे त्या संदर्भातील कोणत्याच विषयाबाबतची कार्यवाही लांबत गेली., कोणतीच प्रक्रिया झाली नाही.
मात्र कोरोनाच्या महा भयंकर दोन वर्षानंतर शाळा सुरु होताच पोर्टल निर्मितीची तयारी सुरु होणे अपेक्षित होते, पण त्यासाठी आता विलंब लागत आहे. नेमके त्याच वेळी एनआयसीने देखील पोर्टलचे काम करण्यास नकार दिल्याने, हे काम अजून लांबणीवर गेले. त्यानंतर नवीन खासगी संस्था नेमण्यात आली. आता सरकारकडून त्या कंपनीला सर्व डेटा देण्यात आला असून ७० टक्के काम पूर्ण झाले असून, अद्याप ३० टक्के काम पूर्ण होण्याचे राहिलेले आहे.