23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये पाण्याच्या साठ्यात घट, तर एकीकडे लाखो लिटर पाणी वाया

रत्नागिरीमध्ये पाण्याच्या साठ्यात घट, तर एकीकडे लाखो लिटर पाणी वाया

यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने, पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पात रुपांतर होऊन साठ्याची क्षमता घटली.

रत्नागिरी शहरवासीयांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता दिसत आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या शिळधरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मागील वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणी कमी झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बाष्पीभवन वेग वाढल्याने साठ्यात घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.शिळ धरणात सध्या ०.५८९ जलघमी जिवंत पाणीसाठा आहे. हा साठा जेमतेम ५ ते ६ जूनपर्यंत पुरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग केला जातो. या धरणातून दररोज २० एमएलडी पाणी उचलले जाते.तापमान वाढल्यामुळे या धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मे महिन्यात दरवर्षी शिळ धरणातील पाणी कमी होत जाते;  परंतु यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक पाणी कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मार्च महिन्यापासून रत्नागिरीतील  तापमान  ३९  अंशसेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने, पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पात रुपांतर होऊन साठ्याची क्षमता घटली. मधल्या  कालावधीत अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरीही धरण परिसरात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचाही फायदा धरण भरण्यासाठी झाला नाही. तसेच धरणातील साठा कमी होण्याचे कारण कडक उष्मा हे आहे की अन्य काही कारणे आहेत याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच इकडे पाणी साठा कमी म्हणून बोंब उठत आहे तर, दुसरीकडे गळक्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाण्याचा नाश होतानाचे चित्र सुद्धा दिसत आहे, त्यामुळे या दोन्हीची उलटसुलट चर्चा रत्नागिरीमध्ये सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular