27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeSindhudurgसिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी टोल नाक्याला दर्शविला विरोध

सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी टोल नाक्याला दर्शविला विरोध

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापुर चे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेतली आणि चर्चा केली.

मुंबई- गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, हातिवले येथील टोल नाके अखेर बुधवारपासून १ जून सुरू करण्यात येणार आहेत. या बाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. ओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असे अनेकांनी म्हटले होते. टोल सुरू केला तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांना टोलमाफी द्यावी, संपूर्ण काम होईपर्यंत टोल सुरू करू नका; अशी मागणी भाजपाने केली होती. ओसरगाव टोल नाक्यावरील होणारी टोलवसुली अखेर थांबविण्यात आली आहे. उप जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असून तोपर्यंत टोल बंद केल्याची  प्रांताधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेतल्यानंतर महामार्गाचे अधिकारी पंदरकर यांनी प्रांतांची घेतली भेट घेतली व पूढील निर्णय होईपर्यंत टोल वसुली थांबविली असल्याची माहिती मिळत आहे.

सायंकाळी उशिरा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापुर चे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. जनतेचा उद्रेक होऊ नये याचा विचार करून बैठकीत निर्णय होईपर्यंत उद्यापासून होणारी टोल वसुली स्थगित केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular