27.8 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

गणेशमूर्ती निर्मितीच्या साहित्यांचे दर वधारले – २० ते २५ टक्के वाढ

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन पुढील...

‘गोगटे’ बाहेरील रस्त्याची दुर्दशा – अभाविप आक्रमक

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरूअप्पा जोशी मार्गावरील...

उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांना शॉक वाढीव वीजबिलांचा फटका

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून २०२५...
HomeDapoliअनिल परब यांच्या रिसोर्टचा पर्यावरण मंत्रालयाने मागितला अहवाल

अनिल परब यांच्या रिसोर्टचा पर्यावरण मंत्रालयाने मागितला अहवाल

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या महाराष्ट्र सरकारला साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्टबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे

रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली मुरुड येथील समुद्रकिनारी बांधलेल्या साई रिसोर्टचे बांधकाम हे अनधिकृत असण्यावरून मागील वर्षापासून अनेक खलबते निर्माण झाली आहेत. परंतु, अद्याप देखील त्यावर कारवाई करण्यात न आल्याने सोमय्या यांनी पुन्हा एकदा त्यावर टीका करून प्रकरणावर पुन्हा प्रकाश टाकून समोर आणले आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या महाराष्ट्र सरकारला साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्टबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याप्रसंगी ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे, तुम्ही केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मंत्रलयाला सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबधी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२२ ला केलेल्या तक्रारीनंतर,  सीआरझेड नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या पत्राचा फोटो देखील पोस्ट केला आहे. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचे रिपोर्ट मागवण्यात आला आहे. राज्य सरकारने काय कारवाई केली आहे अशी विचारणा केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने मागवला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढणार आहे. यानंतर सरकार अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर काय कारवाई करेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतके दिवस भिजत असलेले घोंगडे, आत्ता अखेर खरी स्थिती समोर येण्याची लक्षणे दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular