26.8 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeKokanसावधान ! कोकणामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सावधान ! कोकणामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

मुंबईत बाधितांची संख्या हजारोंच्या पटीत पुढे सरकू लागली आहे तर, कोकणामध्ये देखील कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे.

दिल्ली, मुंबई पुणेसह अनेक ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणेच लहान शहरांमध्ये देखील आता कोरोना पाय पसरायला सुरु करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत बाधितांची संख्या हजारोंच्या पटीत पुढे सरकू लागली आहे तर, कोकणामध्ये देखील कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे.

गेले तब्बल दोन ते तीन महिने शांत झालेल्या कोरोना व्हायरसने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून दररोज सरासरी २ ते ३ रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळेच सध्या जिल्ह्यात तब्बल १२ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. यातील समाधानाची गोष्ट इतकीच कि यातील ११ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत.

साधारण १८ मे पासून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. १८, १९, २०, मे पर्यंत दररोज एक कोरोना रुग्णाची स्वॅब तपासणीत नोंद झाली आहे. २१ मे रोजी २ रुग्णांची नोंद झाली. २२, २३ आणि २४ मे रोजी एकही नवी नोंद नव्हती मात्र २५ मे पासून पुन्हा वाढ दिसत असून २५ मे रोजी १, २६ मे रोजी तब्बल ४, २७ मे रोजी ४ तर आज २८ मे रोजी ३ रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे सध्या जिल्ह्यातील तब्बल कोरोना रुग्ण उपचाराखाली आहेत. मात्र त्यातील समाधानाची बाब म्हणजे यातील ११ रुग्ण गृहविलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. तरीही आता जिल्हावासियांनी पुन्हा एकदा सावध होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा  दोडामार्ग, कणकवलीत कोरोनाचे नवीन रुग्ण सापडू लागले असल्याने पुन्हा परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular