25.5 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraपिंपरी चिंचवडमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबत उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टोलेबाजी

पिंपरी चिंचवडमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबत उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टोलेबाजी

"रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय, गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांचं जाळ उभारलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन तसंच उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचं उद्घाटन दादांच्या हस्ते पार पडले. अजित पवार पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असले की जरा जास्तच खुलतात. त्याचा प्रत्यय पुन्हा पिंपरी चिंचवडकरांना आला आहे. शहरातील पक्षाच्या पदवाटप आणि कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना शहरात वाढवलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याविषयी दादांनी मिश्किल टोलेबाजी केली.

“रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय, गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांचं जाळ उभारलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कुठल्या बहादराचं काय चाललंय, हे आता मला कळेल”, अशी मिश्किल टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

“पिंपरी चिंचवड शहरामध्ये गृह खात्याच्या वतीने ८८ चौकांमध्ये २८७ कॅमेरे आणि मनपाच्या वतीने २२०० कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शहरात ७ हजार ६०० कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठे जाता, दिवसा कुठे जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता गार्डनमध्ये कुठं आणि कुणासोबत गुलूगुलू करता, सगळं सगळ कळणार आहे…”, अशा कोपरखळ्या अजित पवार यांनी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मारल्या.

जो गुंडगिरी करत असेल, जो दशहत निर्माण करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी, त्याचा आम्ही विचार करत नाही. त्याच्यावर जर चार-पाच केसेस दाखल झाल्या तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही शहाणा जागेवर आला नाही तर मग थेट मोक्का लावू. त्याच्या शिवाय काहीच गत्यंतर नाही. आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलिस यंत्रणेला इतरही बाकी भरपूर कामं आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular