31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeSportsया क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, एक स्वप्न मात्र राहिले अपुरे

या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, एक स्वप्न मात्र राहिले अपुरे

महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.

भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज दीर्घकाळ भारतीय महिला क्रिकेटसाठी खेळत होती. महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिने स्वत: ट्विट करून याची माहिती दिली. मिताली राज हिच्या निवृत्तीमुळे महिला क्रिकेटमधील तिच्या २३ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.

तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे कि,  निळ्या रंगाची जर्सी घालून मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी खूप लहान होते. हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला होता. प्रत्येक क्षण मला काहीतरी शिकवत गेला. गेली २३ वर्ष माझ्या आयुष्यातील आव्हानात्मक आणि आनंददायी क्षणांपैकी एक आहेत. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे आता हा प्रवासही संपुष्टात येत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे,  असे मिताली राज हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मिताली राज हिने जून १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या २३ वर्षापासून ती हिंदुस्थानच्या महिला संघाची सदस्य असून यादरम्यान तिने २३२ वन डे, १२ कसोटी आणि ८९ टी-२० सामन्यात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. वन डे मध्ये तिच्या नावावर ७८०५,  कसोटीमध्ये ६९९ आणि टी-२० मध्ये २३६४ धावांची नोंद आहे. वन डेमध्ये सात शतके आणि ६४ अर्धशतके, कसोटीमध्ये एक शतक आणि चार अर्धशतक, तसेच टी-२० मध्ये १७ अर्धशतकांची नोंद तिच्या नावावर आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular