27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeDapoliदापोली पन्हाळेकाजी येथे मगरीने युवकाच्या पायाला घेतला चावा

दापोली पन्हाळेकाजी येथे मगरीने युवकाच्या पायाला घेतला चावा

प्राणिल जाधव यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झालेल्या जखमेवर १८ टाके घालण्यात आले आहेत.

दापोली तालुक्यातील लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजी येथील नदीत म्हैशी धुण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या पायाला मगरीने चावा घेतल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजता घडली असून या युवकाला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळेकाजी येथील प्राणिल जाधव हे ३२ वर्षीय युवक १२ ते १३ म्हैशी धुण्यासाठी घेऊन गावातील कोटजाई नदीत गेले होते. अचानक नदीतील मगरीने त्यांच्या मांडीला मागून चावा घेतला. नदी किनारी असलेल्या प्राणिल यांच्या मित्राने या मगरीला दगड मारून हुसकावून लावले यामुळे प्राणिल यांचे प्राण वाचले आहेत. मित्राने दाखवलेल्या प्रसंगावधान पणामुळे आज प्राणिल चे प्राण वाचले आहेत.

या नदीत सुमारे १०० हून अधिक मगरी असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून अनेक गुरांचे प्राण या मगरीनी घेतलेले असून या मगरीचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून यापुर्वीही करण्यात आली आहे. दरम्यान प्राणिल जाधव यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झालेल्या जखमेवर १८ टाके घालण्यात आले आहेत.

मी कंबरेपर्यंत पाण्यात उभा राहून म्हैशीना धूत असताना एका ६  मीटर लांबीच्या मगरीने माझ्यावर हल्ला केला, मी आणि माझ्या मित्राने तेव्हा प्रतिकार केल्याने मी वाचलो. नाहीतर एरव्ही अनेक गुरे या मगरींच्या तावडीत सापडली असून, प्राणानिशी गेली आहेत. अनेक वेळा पाणी प्यायला गेलेल्या गुरांवर मगरींनी हल्ले केले आहेत. वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular