29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...
HomeDapoliमोबाईल न दिल्यामुळे, १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

मोबाईल न दिल्यामुळे, १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

या विद्यार्थ्याला दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

सध्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच मोबाईलच्या एवढी आहारी गेली आहेत कि, त्यानुसार, त्यांना मोबाईल शिवाय काहीच सुचेनास झाले आहे. काही मुल तर मोबाईल साठी एवढ हट्ट करतात कि, रडून रडून हैराण करतात. शेवटी कुठेतरी रडण आणि गोंधळ थांबावा यासाठी पालक सुद्धा वैतागून मुलांचे मोबाईलचे लाड पुरवतात. पण काही वेळा मुलांचा हा अतिरेक जीवघेणा ठरू शकतो.

पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून दहावीमध्ये यंदा प्रवेश घेतलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ मोबाईलचा हट्ट धरत तो पुरा झाला नाही म्हणून या मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रथमेश दिनेश तुपे, वय १७ असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

या विद्यार्थ्याला दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेची माहिती त्याची आजी रेवती रामचंद्र फावरे यांनी दिली आहे. या विद्यार्थ्याचे वडील मुंबईत नोकरीनिमित्त असतात तर आई दापोली उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी आहे.

आज दहावीच्या निकालाच्या दिवशीच निकाल लागण्यापूर्वीच केवळ मोबाईल देण्यास आजोबांनी नकार दिला म्हणून या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दापोली पोलीस स्थानकात सीआरपीसी १७४ नुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड का‌ॅन्स्टेंबल पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular