27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanकोकणातील "हे" दोन घाट दोन महिने पर्यटनासाठी बंद

कोकणातील “हे” दोन घाट दोन महिने पर्यटनासाठी बंद

रस्ता व डोंगर ढळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट ज्याची ओळख मिनी महाबळेश्वर अशी आहे. एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. रस्ता व डोंगर ढळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी याबाबतचा लेखी आदेश संबंधित सर्व यंत्रणांना दिला आहे.

खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड ही दोन ठिकाणी कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची आवडती ठिकाणे गेल्या काही वर्षापासून बनू लागली आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे,  रस्ता खचणे अशा दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या पावसात या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी जाणे हे पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते,  ही बाब लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांनी रसाळगड व रघुवीर घाट पर्यटनासाठी १ जुलैपासून पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या आदेशान्वये पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. परंतु सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने उचलेल्या या पावलाचे स्वागतदेखील पर्यटकांकडून करण्यात येत आहे. प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर घाट बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश पारित केले असले तरी, सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील गावांना विविध कामे, औषधोपचार आणि अत्यावश्यक सेवेसाठी घाटाचा एकमेव पर्याय असल्याने ते या घाटरस्त्याचा वापर करू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular