21.1 C
Ratnagiri
Tuesday, December 24, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeChiplunपरशुराम घाटात अजस्त्र दरड कोसळल्याने, दुतर्फा वाहनांची कोंडी

परशुराम घाटात अजस्त्र दरड कोसळल्याने, दुतर्फा वाहनांची कोंडी

खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक विशेष करून पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरुनच प्रवास करत आहेत.

कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्हयाला मागील चार दिवसापासून दमदार पावसाचा जोर वाढतच आहे. रात्री उशिरा परशुराम घाटात अजस्त्र दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. या घाटातील दरडींमुळे जनसामान्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने यात अन्य कोणतीही हानी घडलेली नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी प्रविण पवार आणि तहसीलदार जयराज सूर्यवंशी,  महसूल विभागाचे कर्मचारी प्रसन्न पेठे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून रात्री १२:३०च्या सुमारास या महामार्गावरील दगड आणि माती हटवण्यात आली आहे.

चिपळूण प्रशासनातील खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी या परशुराम घाटातील वाहतूक चिरणी मार्गे वळवण्यात आली आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. याचा मोठा परिणाम मुंबई गोवा महामार्गावर झाला होता. दोन दिवसांपूर्वी याच राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्याला भेगा पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक विशेष करून पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरुनच प्रवास करत आहेत. तुर्तास दोन्ही बाजूकडील वाहने रात्री एक वाजण्याच्या सुमारास अखेर रस्ता मोकळा झाल्यावर सोडण्यात आली. परंतु, याच ठिकाणी आणखी काही दरडींचा भाग खाली येण्याची शक्यता दिसून येत आहे. वास्तविक पाहता हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार असेल तर प्रशासनाने काही गंभीर घडण्याच्या आधीच त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

एप्रिल-मे दरम्यान महिन्याच्या कालावधीत तब्बल एक महिना परशुराम घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणि अखेर त्याचा प्रत्यय आलाच.

RELATED ARTICLES

Most Popular