23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKokanचाकरमान्यांसाठी खुशखबर, गणेशोत्सवासाठी स्पेशल ७४ जादा गाड्या

चाकरमान्यांसाठी खुशखबर, गणेशोत्सवासाठी स्पेशल ७४ जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी वर्गाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने गर्दी कमी करण्यासाठी, विशेष ७४ गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

पावसाळा सुरु झाला कि आपसूकच प्रत्येक कोकणकराला वेध लागतात ते गणपतीचे. अनेकांची गणेशोत्सवासाठी गावी येण्यासाठी लगबग सुरु होते. अनेक चाकरमानी मुंबई, पुणे, नाशिक इतर ठिकाणाहून कोकणात दाखल होण्यासाठी बस, रेल्वे, खाजगी गाडी घेऊन दाखल होतात.

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी वर्गाचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने गर्दी कमी करण्यासाठी, विशेष ७४ गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई सावंतवाडी, नागपूर मडगाव विकली स्पेशल, पुणे -कुडाळ, पुणे- थिविम-कुडाळ, पनवेल- कुडाळ- थिविम या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यांचे साधारण अंदाजपत्रक देखील देण्यात आले आहे. ते पाहूया. मुंबई सावंतवाडी ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दरदिवशी रात्री १२.२० वाजता सुटणार असून, परतीच्या प्रवासात ०७.४० ला सुटून सांयकाळी ३.४५ वाजता मुंबई येथे पोहचणार आहे या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, सावर्डे, अरवली रोड ,संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ असे थांबे असणार आहेत. या गाडीच्या ४४ फेऱ्या होणार आहेत.

तर नागपूर मडगाव विकली स्पेशल या गाड्याचे ४२ फेऱ्या धावणार असून २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे. या गाडीला वर्धा फुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, असे थांबे देण्यात आले आहेत.

पुणे- कुडाळ ही गाडी २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये धावणार असून या गाडीच्या ६ फेऱ्या होणार असून, या गाडीला लोणावळा, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ असे थांबे असणार आहेत.

पुणे– थिविम, कुडाळ- पुणे या स्पेशल गाडीच्या ६ फेऱ्या होणार असून ही गाडी २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधी मध्ये धावणार आहे. या गाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ असे थांबे दिले गेले आहेत.

२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये धावणारी पनवेल कुडाळ स्पेशल गाडी या गाडीचे सहा फेऱ्या होणार असून या गाडीला रोहा माणगाव खेड चिपळूण सावर्डे संगमेश्वर रत्नागिरी अडवली विलवडे राजापूर वैभववाडी नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ,-थिविम असे थांबे असणार आहेत दरम्यान या गाड्यांचे आरक्षण ४ जुलै पासून सुरू होणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular