24.4 C
Ratnagiri
Tuesday, December 24, 2024

पूर नियंत्रणासाठी २२०० कोटींचा प्राथमिक आराखडा – आमदार शेखर निकम

पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपशाच्या कामासाठी निधीची...

रत्नागिरीत ‘सीएनजी’ची गळती; परिसरात भीती

शहरातील हिंदू कॉलनी येथे मोटारीमधील सीएनजीच्या टाकीतून...

ढगाळ वातावरणाने हापूसवर तुडतुडा, बागायतदार चिंतेत

सलग दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे रत्नागिरीतील...
HomeRatnagiriरिक्षाचालकांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यापैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात

रिक्षाचालकांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यापैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात

गणपतीपुळे फिरण्यासाठी रिक्षा भाड्याने घेण्याचा बहाणा करुन दोन रिक्षा चालकांना प्रसादाच्या लाडूतून गुंगीचे औषध देवून लुटणाचा प्रकार घडला होता.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहर परिसरामध्ये गणपतीपुळे फिरण्यासाठी रिक्षा भाड्याने घेण्याचा बहाणा करुन दोन रिक्षा चालकांना प्रसादाच्या लाडूतून गुंगीचे औषध देवून लुटणाचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपी फरार होते. दरम्यान या प्रकरणात मध्यप्रदेशमधील टोळीतील एका संशयिताला शहर पोलीसांनी गुजरात पोलीसांकडून ताब्यात घेतले असून, कसून चौकशी सुरु आहे.

रत्नागिरी शहरातील दोन रिक्षा चालक ११ जून रोजी  बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघड झाली होती. ११ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास बाजारपेठेतून दोन रिक्षा व्यायसायिकांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून एक टोळके घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही रिक्षा चालकांचा संपर्क होत नसतानाच एक रिक्षा चालक दुपारी व एक रिक्षा चालक सायंकाळी परटवणे, उद्यमनगर या ठिकाणी रिक्षातच बेशुध्द अवस्थेत आढळून आले. यानंतर ही घटना उघड झाली होती.

आशिष संजय किडये रा. मांडवी, रत्नागिरी,  विनेश मधुकर चौगुले रा. कसोप, रत्नागिरी या दोन्ही काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि जवळचे पैसे टोळीतील तिघांनी हातोहात लांबविले होते. त्यानंतर शहर पोलीसांनी तिघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली होती. मात्र शोधात कुठेतरी कमी राहत होती, आणि या गुंगी आणून लुटणाऱ्या टोळीचा थांगपत्ता काही लागत नव्हता.

गुजरात राज्यात अशाच प्रकारे रिक्षा व्यावसायिकांना लुटणाऱ्या टोळीला तेथील पोलीसांनी अटक केली होती. तेथील चोरीची पद्धत रत्नागिरीतील चोरी सारखीच होती. त्यानंतर शहर पोलीसांनी मध्यप्रदेश मधील एका तरुणाला गुजरात पोलीसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतले आहे आणि पुढील चौकशी सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular