29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriशीळ धरण ओसंडून वाहू लागले, लगतच्या भागात भूस्खलनाची भीती

शीळ धरण ओसंडून वाहू लागले, लगतच्या भागात भूस्खलनाची भीती

धरण भरुन वाहू लागल्यामुळे भविष्यात येथील भाग कोसळण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात पुरेसे पाणी साठले असून, मुसळधार पावसाचा जोर वाढला सांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात भूस्खलन होते. गेली पाच वर्षे सातत्याने येथील डोंगरातील दगड, माती खाली वाहून येत आहे. धरण भरुन वाहू लागल्यामुळे भविष्यात येथील भाग कोसळण्याची शंका व्यक्त केली जात आहे. गतवर्षी कोसळलेल्या दरडीपासून काही अंतरावर वाडी वस्ती आहे. त्यामुळे या घरांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचा जोर जुलै महिन्यात वाढत असल्याने भूस्खलनाची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्या वरुन पाणी जाऊ लागले लागल्यामुळे नदीपात्राची पातळी वाढली आहे. या सांडव्यापासून काही अंतरावर असलेला डोंगराचा भाग यंदाच्या पावसामध्ये ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहराला लागणारे पाणी पुरवठा करण्यासाठी शिळ येथे धरण बांधण्यात आले. पाण्याची वाढती गरज लक्षात घऊन धरणाची साठवण क्षमतेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी शेजारी सांडवा बांधण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीत सरासरी पावसाची नोंद चांगलीच झाली आहे. त्यात धरण क्षेत्रांमध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने शिळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

आठ दिवसांपूर्वीच धरणातील सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यंदा रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मे महिन्याच्या अखेरीस एक दिवसाआड पाणी सुरू ठेवण्यात आले. पण मान्सून लांबल्यामुळे ९ जून नंतर अधीमधी पडणाऱ्‍या सरींनी थोडासा दिलासा दिला. धरण क्षेत्रातही पाणी वाढू लागले. सध्या धरणात पुरेसा साठा झाला असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular