29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriअल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिप्रसंग तरूणावर गुन्हा दाखल

अल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिप्रसंग तरूणावर गुन्हा दाखल

तिला आरडाओरड करू नकोस नाहीतर तुला इथेच ठार मारेन अशी धमकी दिली.

अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पावसमधील तरूणाने तिच्यावर ४ महिने वारंवार अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पंचक्रोशीत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तरूणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार उर्फ बबलू रामचंद्र नैकर (वय २३, रा. पावस नालेवठार) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार मे २०२३ मध्ये मे महिन्याच्या सुट्टीत तरूणी एका ठिकाणी कामाला जात होती. तेथील काम आटोपून ती घरी येत असताना ओंकार उर्फ बबलू हा तरूण मोटारसायकलवरून सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिथे आला.

ओंकार उर्फ बबलू याचे त्या तरूणीच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्यामुळे त्यांची ओळख होती. तिला रस्त्यात गाठल्यानंतर त्याने लांजामध्ये आपल्या वहिनीची तब्येत बिघडली आहे. तिला पाहण्यासाठी माझ्यासोबत चल असे बबलू याने तरूणीला सांगितले. त्यावेळी आईला विचारल्याशिवाय मी येणार नाही असे सांगताच तू आईची काळजी करू नकोस. मी त्यांना फोन करून सांगतो असे सांगून त्या तरूणीला जबरदस्तीने लांजा येथे घेऊन गेला होता. लांजात एका घरात तो तिला घेऊन गेला. त्यावेळी त्या घरात कोणीच नव्हते. त्यावेळी तिने तूझी वहिनी कुठे आहे अशी विचारणा केली असता तिला आरडाओरड करू नकोस नाहीतर तुला इथेच ठार मारेन अशी धमकी दिली. याचदरम्यान त्या तरूणाने तिच्यावर अतिप्रसंग केला.

अख्खी रात्र लांजात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला घेऊन तिच्या घरी आला व हा प्रकार कोणाला सांगितलास तर तूला . ठार मारून टाकेन अशी पुन्हा धमकी दिली. या प्रकारानंतर जून २०२३ मध्येही असाच प्रकार घडला. या घटनेनंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ती शाळेतून सुटल्यानंतर घरी येत असताना भर बाजारपेठेत पुन्हा ओंकार उर्फ. बबलू याने तिला दुचाकीवर बसवले व पुन्हा मित्राच्या घरी तिला घेऊन गेला व त्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग केला. ३१ ऑगस्टला तरूणीला घेऊन गेलेल्या ओंकार उर्फ बबलू याने १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता तिला तिच्या घरी आणून सोडले व कोणाला याबाबत सांगितलेस तर तुझा खून करेन अशी धमकी दिली, असे तिने तक्रारीत ‘म्हटले आहे.

३१ ऑगस्टपासून घरातून गायब झालेली तरुणी दुसऱ्या दिवशी सकाळी परत आल्यानंतर तरूणीच्या आईने तिच्याकडे विचारणा केली. मात्र त्या तरूणीने घाबरून मैत्रिणीकडे रहायला गेले होते असे सांगितले. थोड्या वेळानंतर त्या तरूणीला त्रास होऊ लागला आणि सारा प्रकार उघडकीस आला. घडल्या प्रकाराबाबत तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर आईने तिला घेऊन थेट पोलीस स्थानक गाठले. तरूणीवर जबरदस्ती करून वेळोवेळी तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ओंकार उर्फ बबलू रामचंद्र नैकर याच्याविरोधात भादंविक ३७६ (२), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), ३६६, ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५ (एल), ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular