27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriवांदरकर गुरुजी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन

वांदरकर गुरुजी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन

रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले महादेव नारायण वांदरकर गुरुजी यांचे आज मंगळवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. महादेव नारायण वांदरकर यांचा जन्म १५ जुलै १९१६ रोजी झाला होता. १९३५ साली ते सातवी पास झाले. ब्रिटीशांची जुलमी राजवट अनुभवलेल्या वांदरकर गुरुजींनी, महत्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात देखील सहभाग घेतला होता. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यानच्या पदयात्रेत त्यांचा सहभाग होता. १९३१ मध्ये स्वातंत्रवीर सावरकरांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष देखील गुरुजींनी पाहिला होता. त्यांच्या मार्गदर्शनखाली आजवर त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. अनेक विद्यार्थी आज विविध उच्च स्थरीय पदांवर कार्यान्वित आहेत. त्यातील काही विदयार्थ्यांनी मिळून गुरुजींचा १०० वा वाढदिवस देखील साजरा केला होता.

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नदीला पूर आलेला असताना पोहत पलीकडे जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक, स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष धडे देणारे असे हे वंदनीय वांदरकर गुरुजी. वयाच्या १०५ वर्षापर्यंत नियमितपणे ते श्री राधाकृष्ण मंदिरात गीतेचा अध्याय वाचत असत. चार दिवसांपूर्वी त्यांचा १०६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. समाज प्रबोधनपर अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्या सक्रीय सहभाग असायचा.

अशा तपस्वी शिक्षकाने आज सकाळी ८ वाजता वयाच्या १०६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे त्यांची मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ६ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular