27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...

गणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेला एक तरूण वहाळाला...

ग्राहक बनून आलेल्या ४ महिलांनी ज्वेलर्समधून मंगळसूत्र लांबविले

मंगळसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये आलेल्या ४...
HomeChiplunबांग्लादेशी घुसखोरांचा चिपळूणला अड्डा, यंत्रणांकडून चौकशी

बांग्लादेशी घुसखोरांचा चिपळूणला अड्डा, यंत्रणांकडून चौकशी

चिपळूण परिसरातील औद्योगिक वसाहत परिसर आणि नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात त्यांचे वास्तव्य आहे.

काही बांग्लादेशी नागरिक मागील जवळपास १५ वर्षांपासून चिपळुणातील औद्योगिक वसाहत परिसर आणि नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात वास्तव्याला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यातील काहीजण तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत तर काही रडारवर आहेत. त्यामुळे चिपळूण परिसर बांग्लादेशी घुसखोरांचा अड्डा बनत असल्याचे समोर येत आहे. चिपळूणलगतच्या खेडर्डी येथे तीन बांग्लादेशी अवैध मार्गाने राहत असल्याचे काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणेने उघड केले होते. त्यानंतर डेरवण येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. आता एका बांग्लादेशी
नागरिकाला मुंबई विमानतळावर पकडण्यात आले. तो आईला भेटण्यासाठी ढाका येथे जात असताना तपास यंत्रणेने त्याला विमानतळावर पकडले.

चौकशीदरम्यान त्याने आपला पत्ता चिपळूणचा असल्याचे सांगितले. आधार कार्ड आणि पॅनकार्डही दिले. महाडमधील एका रुग्णालयाच्या खोट्या जन्मदाखल्यामुळे आणि त्याच्या बोलीभाषामुळे तो बांग्लादेशी असल्याचे उघड झाले. बांग्लादेशातून कोलकातामार्गे हे बांग्लादेशी भारतात येत आहेत. तेथून कामाच्या शोधात ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात येत आहेत. चिपळूण परिसरात ही आता बांग्लादेशींची संख्या वाढत असल्याचे तपास यंत्रणेच्या चौकशीतून पुढे येत आहे. या परिसरात नेमके किती बांग्लादेशी आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. चिपळूण परिसरातील औद्योगिक वसाहत परिसर आणि नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात त्यांचे वास्तव्य आहे.

मागील बऱ्याच वर्षांपासून यातील काही लोक खेडीं, लोटे, लवेल, घाणेखुंट आणि कळंबस्ते, सावर्डे, डेरवण परिसरात राहत आहेत. भारतीय कागदपत्रेही खरेदी केली आहेत. काही लोक अनेक वर्षापासून अंगमेहनतीचे काम करून येथे राहत आहेत. व्यावसायिकांना स्थानिक पातळीवर कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे त्यांची जागा बांग्लादेशी घेत आहेत. बांग्लादेशमधून अवैध मार्गाने आलेल्या नागरिकांना आधार कार्ड, पॅनकार्ड आणि रेशनकार्डसह इतर सुविधा मिळत आहेत. जन्मदाखलासुद्धा मिळत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेचा गलथान कारभार आता समोर आला आहे. बांग्लादेशींना स्थानिक कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी काही व्यावसायिकही सरकारी यंत्रणेला प्रोत्साहन देत असल्याची चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular