27.5 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

मटण मार्केट इमारतीचे मजबुतीकरण वादात – चिपळूण पालिका

शहरातील गेल्या २० वर्षांपासून पडीक असलेल्या मच्छी...

बांबू फर्निचर क्लस्टर कारखाना सुरू करणार – उदय सामंत

बांबू लागवडीतून कोकणातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती...

मत्स्य विद्यापीठाचा अहवाल धूळ खात: मुणगेकर समिती

रत्नागिरी व नागपूर महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात...
HomeRatnagiriरेल्वे प्रवाशाच्या डोक्यात बसला दगड -निवसर रेल्वेस्थान

रेल्वे प्रवाशाच्या डोक्यात बसला दगड -निवसर रेल्वेस्थान

कोकण रेल्वे प्रशासनाने पर्यटन-सुट्या आणि दररोजची गर्दी लक्षात घेऊन अनेक जादा गाड्या सोडल्या आहेत. लोकांचा प्रवासही सुकर होत आहे. मात्र मंगळवारी रेल्वेच्या तिरुन्नवेल्ली जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या डोक्याला दगड लागून गंभीर जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अब्दूलमज्जीद अबूबकर काडबेन (वय ५५, रा. सध्या माहिम-मुंबई मुळ : केरळ) असे जखमी प्रौढाचे नाव असल्याची माहिती रुग्णालयातील पोलीस चौकीतून देण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९.३० वा. च्या सुमारास निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. अधिक वृत्त असे की, अब्बूलमज्जीद काडबेन हे मुंबईला माहिम येथे रोजरोटीचे काम करतात. मंगळवारी ते तिरुनवेल्ली- जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या मागे साधारण निवसर रेल्वे स्टेशनच्या आसपास डोंगरातून दगड खाली आली आणि चक्क खिडकीतून त्यांच्या डोक्याला लागला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

बोगीमधील इतर प्रवाशांनी त्यांना पाणी वगैरे देऊन डोक्याला पट्टी बांधून रत्नागिरी रेल्वेस्टेशनपर्यंत आणले. रेल्वे पोलिसांना खबर देण्यात आली. पोलीस तत्काळ बोगीत आले. त्यांनी या अब्दुलमज्जीद काडबेन यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांच्या डोक्याला पाच-सहा टाके पडले असल्याचे काडबेन यांनी सांगितले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. उन्हाळ्यामुळे रेल्वेची खिडकी उघडी असल्याने हा प्रकार घडला. रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावर डोंगराळ भागात काही ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही जाळ्या नसून रेल्वेच्या जाण्या-येण्याच्या. हादऱ्याने दगड खाली येत असल्याचे स्पष्ट होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची काळजी घ्यावी असे रुग्णालयात चर्चा रंगली होती.

RELATED ARTICLES

Most Popular