25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunपरशुराम घाटाची पाहणी पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न - मंत्री ना. रवींद्र...

परशुराम घाटाची पाहणी पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न – मंत्री ना. रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.. चिपळूण दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी परशुराम घाटात सुरू असलेल्या महामार्ग कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. पर्यंत महामार्गाच्या एक लेनचे काम पूर्णत्वास जाईल. त्याचप्रमाणे महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी ब्रिज आहेत. त्यांची कामे तेथील परिस्थितीतील या ब्रिजची कामे लवकरच पूर्णत्वास जातील असे त्यांनी सांगितले. याबरोबरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्विस रोडचे काम देखील पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रांत कार्यालयाचे अधिकाऱ्यांना याबाबत हे काम तातडीने मार्गी लावा अशा सूचना केल्या. लांजा येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले तसेच नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, शितल सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरूप तसेच आत्माराम धुमक, शेखर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular