26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeMaharashtraमुंबईला येणाऱ्या रेल्वेला भीषण अपघात…

मुंबईला येणाऱ्या रेल्वेला भीषण अपघात…

प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली.

जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईला येणाऱ्या एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. म ात्र त्याच वेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे धूर आल्याने आगीची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या, मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला.

असा झाला अपघात – ही ट्रेन जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका-मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे ३५ ते ४० प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते आहे की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान मुंबईकडे येत असताना ही घटना घडली. कोणी तरी ओरडलं गाडीला आग लागली. त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या. दुसऱ्या ट्रॅकवरून बंगळुरू गाडी येत होती. त्यामुळे काही लोकं चिरडले. स्लीपरच्या दरवाजात लोक बसले होते. गाडीचा ब्रेक दाबल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यांनी आग लागली असं ओरडले. त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या. साडे तीन ते चार वाजता ही घटना घडली. आता गाडी सुरू झाली आहे. पाचोरा स्टेशनला गाडी थांबली आहे. ही दुर्घटना दुःखद आहे, असे प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular