29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriरत्नागिरी परिसरात संतापाची लाट, गाभण गायीवर कुदळाने केले वार

रत्नागिरी परिसरात संतापाची लाट, गाभण गायीवर कुदळाने केले वार

एका दुकानदाराने हा प्रकार पाहिला आणि त्याला घामच फुटला.

गाभण गायीवर कुदळीचे घाव घालून गायीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरूविरोधात कुवारबांवमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही घटना कळताच शेकडो लोकं अचानक रस्त्यावर जमल्याने काही काळ तणाव देखील पहायला मिळाला. मात्र पोलिसांनी सारी परिस्थिती गांभिर्याने आणि संयमाने हाताळल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गायीवर कुदळीचे घाव घालणाऱ्या अनिल अर्जुन वाडकर (वय ४८) याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशीरापर्यंत सुरू होती.

मात्र त्याने हे कृत्य का केले याविषयी नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी नागरिकांनी शांतता राखावी, संयम पाळावा, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. रत्नागिरीत मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम सुरू कुवारबाव परिसरात एक विचित्र प्रकार घडला आहे. गाभण गाय बसलेली असताना या गायीवर कुदळीचे घाव घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न एका व्यक्तीकडून करण्यात आला. एका दुकानदाराने हा प्रकार पाहिला आणि त्याला घामच फुटला.

टोकदार कुदळीचे घाव – कुवारबांव येथे महामार्गाचे काम सुरू आहे. अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. सोम वारी दुपारच्यावेळेस एक गाभण गाय पाडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बसली होती. त्यावेळी संशयित आरोपी अनिल अर्जुन वाडकर हातात कुदळ घेऊन धावत आला आणि त्यांने त्या गाभण गायीवर टोकदार कुदळीचे घाव घातले असे प्रत्यक्षदर्शीनी याबाबत पोलिसांना माहिती देताना सांगितले. यामुळे गाय गंभीररित्या जखमी झाली.

पोलिसांना माहिती – हा प्रकार दुकानदारांनी पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच शहर पोलिसांचे एक पथक कुवारबावकडे रवाना झाले. मात्र त्यापूर्वी परिसरात मोठा जमाव जमला होता. या प्रकाराची माहिती कुवारबाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता घटनास्थळी मोठा जमाव जमला. येथील वातावरण कमालीचे नापले होते. मात्र शहर पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

घरी पळाला – गायीवर कुदळीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपी अनिल वाडकर याने कुदळ घेऊन घराकडे धाव घेतली. तो घरी पळून गेला मात्र पोलीस त्याचा शोध घेत होते. घटनास्थळी गाय रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी तात्काळ गायीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

डॉक्टरांना पाचारण – गंभीर जखमी झालेल्या गायीवर उपचार होणे गरजेचे होते. त्यानुसार पोलिसांनी प्राणमित्र व पशुवैद्यकीय अधिकारी यांची मदत घेऊन गायीवर  तात्काळ उपचार केले व त्या गायीला कुवारबाव परिसरात असलेल्या गो- शाळेत हलविण्यात आले. गायीवर कुदळीचे घाव घालून पसार झालेल्या संशयित आरोपी अनिल अर्जुन वाडकर याने आपल्या घराकडे धूम ठोकली व पत्नीला बाहेरून घराला कुलूप लावायला सांगितले. यावेळी पत्नीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ कुलूपे लावली होती व पती घराबाहेर गेला आहे अशी माहिती ती पोलिसांना देत होती, असे पोलिसांनी नंतर पत्रकारांना सविस्तर माहिती देताना सांगितले.

पोलिसांनी अनिल वाडकर याच्या घराची कुलूपे तोडली व त्याला घरातून ताब्यात घेतले. रक्ताने माखलेली कुदळदेखील पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतली आहे. या परिसरात संतापाचे वातावरण असल्याने पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अनिल अर्जुन वाडकर (वय ४८, रा. कुवारबांव) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भादंविक ४२९ व प्राण्यांना निर्दयतेने वागवणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. नागरिकांनी संयम आणि शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular