22.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeKokanआणखी एक संकट, रक्त गोठविणाऱ्या थंडीची लाट

आणखी एक संकट, रक्त गोठविणाऱ्या थंडीची लाट

हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात यंदा पावसान चांगलाच धुमाकूळ घातला, पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं. अतिवृष्टीचा मोठा तडाखा महाराष्ट्राला बसला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेला, तर काही ठिकाणी नद्यांना आलेल्या पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे घरादारासहीत पशुधन देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला. पुन्हा एकदा एक मोठं संकट राज्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रात पुढील २ दिवसांमध्ये सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील ४८ तासांमध्ये महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील १४ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी माहिती दिली.

सतर्कतेचं आवाहन – दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडका वाढणार आहे, उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान घसरणार आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. ज्या लोकांना श्वासनाचा त्रास आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रासोबतच उत्तर भारतात देखील थंडीचा कडका आता वाढणार आहे. पुढील काही दिवस तापमानात चांगलीच घट होणार असून थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र गारठण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular