29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriभगवती बंदर येथे सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

भगवती बंदर येथे सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

दगडांमध्ये सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढून वाहून जाऊ लागला.

धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शहरातील भगवती बंदर ब्रेकवॉटर वॉल येथे समुद्रात सेल्फी काढताना लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १) घटना घडली. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढला. अल्लाउद्दीन नसिरूद्दीन मोंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मोंडल हा हार्बर अटलांटिक फिश एक्स्पोर्ट या कंपनीत कामाला होता.

रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने तो मित्रासोबत भगवती बंदर येथील ब्रेकवॉटर वॉलवर गेला होता. तिथे फिरत असताना समुद्राच्या पाण्याजवळ गेला आणि या धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह त्याला अनावर झाला. दगडांमध्ये सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न झाला; परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. याबाबत त्याचा मित्र राकीबुल इस्लाम साहेब अली मोल्ला याने फोन करून अल्लाउद्दीन मोंडल पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले.

तसे कंपनीतील इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अल्लाउद्दीनला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोंडलला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular