23.2 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeEntertainmentगंगुबाई काठियावाडी चित्रपट रिलीजपुर्वीच वादात, कुटुंबीयाने केला विरोध

गंगुबाई काठियावाडी चित्रपट रिलीजपुर्वीच वादात, कुटुंबीयाने केला विरोध

या चित्रपटात आमच्या आईला एका सामाजिक कार्यकर्त्याऐवजी वेश्याच्या रुपामध्ये सादर करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’  २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाच्या कथानकावरून आणि चित्रपटात आलियाने केलेल्या गंगूबाईच्या भूमिकेमुळे रिलीज पूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अलीकडेच गंगूबाईच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाविरोधात कुटुंबीयांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. या चित्रपटात आमच्या आईला एका सामाजिक कार्यकर्त्याऐवजी वेश्याच्या रुपामध्ये सादर करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

गंगूबाई यांचा मुलगा बाबुरावजी शहा म्हणाले,  माझ्या आईला चित्रपटात वेश्या म्हणून ठेवण्यात आले. आता लोक त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलत आहेत. या गोष्टींचा आमच्या कुटुंबाला खूप त्रास होतो. दुसरीकडे,  गंगूबाईची नात भारती म्हणाल्या की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी पैशाची लालूच दाखवून माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. ते अजिबात स्वीकारता येणार नाही. निर्मात्यांनी चित्रपट बनवण्यासाठी कुटुंबाची संमतीही घेतलेली नाही किंवा पुस्तकासाठी कोणी आमच्याकडे आलेले देखील नाही.

या चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारताना भारती म्हणाल्या, ‘माझी आजी कामाठीपुरा येथे राहायची, त्यामुळे तिथे वास्तव्यास असणारी प्रत्येक महिला वेश्या झाली होती का?  माझ्या आजीने तिथली वेश्येची ४ मुले दत्तक घेतली होती. आम्ही त्यांच्या कुटुंबातील आहोत. निर्मात्यांनी आम्हाला बेकायदेशीर ठरवले आहे. आमच्या आजीने दत्तक घेतले, तेव्हा कायदे बनले नव्हते. परंतु, त्यामुळे या चित्रपटाच्या टीझरमुळे आम्हाला घराबाहेर पडणे डोकेदुखी ठरत आहे.

भारती पुढे म्हणाल्या, ‘एकीकडे आम्ही आमच्या आजींबद्दल गोष्टी अभिमानाने लोकांना सांगतो, आणि चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर लोक म्हणू लागले आहेत की तुझी आजी वेश्या होती. माझी आजी कामाठीपुरा संस्थेच्या विकासासाठी आयुष्यभर राबली. पण या चित्रपटाच्या लोकांनी माझ्या आजीचे काय बनवून ठेवले आहे?  आता लोक आम्हाला वेश्येची मुले म्हणू लागले आहेत. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबचे घराबाहेर पडणेही बंद झाले आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून खऱ्या गंगूबाई कुटुंबाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular