29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...
HomeMaharashtraआंबा घाट बंदच, कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग सुरु

आंबा घाट बंदच, कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग सुरु

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २२ जुलैला आलेल्या महापूरामुळे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाट येथे मुसळधार पावसामुळे डोंगरांची घसरण झाल्याने, दरडी मोठ्या प्रमाणात कोसळल्याने तसेच महामार्ग खचल्याने मागील आठ्वड्यापासून आंबा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे आणि या मार्गावरील वाहतुक पुन्हा सुरु होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व राजापूरमधून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीसाठी रत्नागिरी एसटी आगाराने दोन नवीन बस फेऱ्या सुरू केल्या आहेत.

गुरुवारपासून या बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, अणुस्कुरा घाटमार्गे पर्यायी मार्ग म्ह्णून एसटीने आपली वाहतूक वळवली आहे. त्यामुळे आत्ता कोल्हापूरला एसटीने जाणे शक्य होणार आहे. आंबा घाट बंद असल्यामुळे रत्नागिरी व राजापूरमधील प्रवाशांकरिता रत्नागिरी व राजापूर एसटी आगारांनी दोन फेऱ्या सुरू केल्या असून, रत्नागिरी, पाली, लांजा, पाचल, अणुस्कुरा कोल्हापूर व राजापूर, पाचल, अणुस्कुरा, कोल्हापूर अशा या दोन फेऱ्या आहेत.

aamba ghat band

रत्नागिरी आगारातून कोल्हापूरसाठी सकाळी ७.३० ला गाडी सुटते. ती दुपारी १.५ ला पोहोचते. हा प्रवास १५४.८ कि.मी.चा असणार आहे. त्यानंतर कोल्हापूरमधून रत्नागिरीला परतण्यासाठी दुपारी २ वाजता गाडी सुटेल आणि ती ७.३५ मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचणार आहे. दुसरी बसफेरी रत्नागिरीतून दुपारी १.३० वाजता सुटून रात्री कोल्हापूरला वस्ती करेल आणि कोल्हापूरहून या बसची फेरी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता सुटून दुपारी रत्नागिरीमध्ये पोहोचेल. त्याचप्रमाणे कोल्हापूरला जाण्यासाठी राजापूर आगारातून सकाळी ७ वाजता आणि दुपारी ३ वाजता बसफेरी आहे. तर कोल्हापूरमधून या बसच्या फेऱ्या राजापूरसाठी दुपारी १२ वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता सुटणार आहे. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular