24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriघरात घुसून महिलेला मारहाण, जीवे मारण्याची धमकी

घरात घुसून महिलेला मारहाण, जीवे मारण्याची धमकी

चानक दरवाजावर काठीने जोरजोरात ठोठवल्याचा व दरवाजा उघडा असा आवाज कानी पडला.

रत्नागिरी शहरामध्ये किरकोळ जुन्या वादातून, एका महिलेला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे, त्या महिलेच्या घरातील मालमत्तेचे देखील नुकसान करण्यात आले आहे. अभ्युदयनगर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घराच्या काचा काठीने फोडून, घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ममता हनुमंत यादव वय ३५, रा. अभ्युदयनगर, नाचणेरोड, रत्नागिरी यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांनी दरवाजा आतील बाजूने कडी लावून घेतला होता. यावेळी त्यांना अचानक दरवाजावर काठीने जोरजोरात ठोठवल्याचा व दरवाजा उघडा असा आवाज कानी पडला. त्यावेळी कोणतरी खिडकीच्या काचा फोडून व लाईटचा मीटरचीही तोडफोड करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ममता यांनी दरवाजा उघडला.

यावेळी जगन्नाथ खेडेकर याने घरात घुसून ममता यांच्या मुलावर काठी उगारत तुझा जीव घेतो असे म्हणत अंगावर धावत गेला. याचवेळी मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या ममता यांच्यावर खेडेकर याने खिडकीची फोडलेली काच फेकून मारल्याने, त्यामध्ये त्या जखमी झाल्या.

या भांडणामध्ये खेडेकर यांचा मुलगा, बायको, सून तेथे घरात घुसली आणि त्यांच्या मुलाने धमकी देत बंदुकीच्या गोळीने तुला ठार मारतो अशी धमकी दिली. त्यानंतर सून व सासू ममता यांच्या अंगावर धावून गेल्या व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबतची फिर्याद ममता यादव यांनी शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर जगन्नाथ खेडेकर याच्यासह ३  जणांवर ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular