मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी दुचाकी वरील दोघांना धडक देऊन फरार झाला होता. डंपर चालकाचा शोध लागत नसल्याने नाणिज, पाली, खानू, बांबर, हातखंबा, निवळीव परिसरातील शेकडो ग्रामस्थ फरार चालकासहित डंपरचा शोध घेण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते. अखेर ग्रामस्थांच्या रेट्यामुळे पोलिसांनी चालकास रात्री उशिरा अटक केली आहे. या अपघाताबाबत पाली पोलीस दूर क्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी नाणिज जुना मठ येथे झालेल्या डंपर दुचाकी अपघांतातील फरार डंपर चालकाला रात्री ताब्यात घेण्यात आले. या अपघातानंतर दिवसभर या महाम ार्गावरील नाणिज, पाली, हातखंबा, खेडशी यासह विविध ठिकाणांच्या सीसीटीव्हींचे फुटेज पाहून ग्रामस्थ, पोलीस अज्ञात डंपरचा शोध घेत होते.
अखेरीस रात्री त्या डंपर क्र. एम एच २० इ एल ८११४ डंपर सहित त्याचा चालक लीलाधरी महादेव सॉ, २० रा. रोहनियातंड झुमरीतलया, जि. कोडरमा, राज्य झारखंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असूनकोर्टापुढे हजर केले. धडक देऊन त्याच्यावरील चालक डंपर सहित फरार झाला होता. या धडकेत दुचाकी वरील अरुण अनंत दर्डी, ३५ रामचंद्र देवजी दरडी, ६५ रा. दरडीवाडी नाणीज हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघ- ाताची खबर नाणीजचे पोलीस पाटील नितीन रामा कांबळे यांनी दिल्यावरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक लीलाधरी महादेव सॉ याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६,१२५ (अ, ब ) मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४, (१,२),१७७ अन्वये रत्नागिरी ग्रामीण पो- लीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एन. कदम हे करीत आहेत.
अपघात घडल्यानंतर फरार डंपर सहीत चालकाचा शोध घेण्यासाठी सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, गौरव संसारे, सुरेंद्र (बंड्या) सावंत, विलास बेर्डे, राजेश कामेरकर, विनोद भागवत, शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश म्हाप, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, हातखंबा युवा सेना विभागप्रम ख अॅड. सुयोग कांबळे, विलास बोंबले स्थानिक ग्राम स्थांसह दिवस-रात्र प्रयत्न करत होते. फरार डंपर चालकाचा शोध लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी देवळे येथील महामार्ग ठेकेदार कंपनीचे कार्यालय किंवा पोट ठेकेदार कंपनीचे लोक डंपर शोधण्यासाठी कोणतेच सहकार्य करत नव्हते.
ठेकेदार कंपनीला बोलते करण्यासाठी अखेरीस प्रसाद दिल्यावर अखेरीस त्या डंपर चालकाचा शोध लागला. याशिवाय त्या पोट ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाम ळे हा अपघात घडल्याने त्या कंपनीत कडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणार असल्याचे त्या कंपनीने कबूल केले आहे. अपघातात मृत्यू झालल्या चुलत्या पुतण्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी नाणीज येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.