26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRajapurराजन साळवींच्यामागे एसीबीचा ससेमिरा सुरूच…

राजन साळवींच्यामागे एसीबीचा ससेमिरा सुरूच…

एसीबीने दिलेल्या नोटीसमध्ये साळवी कुटुंबियांविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख आहे.

माजी आमदार राजन साळवी याच्यामागचा एसीबीचा (अॅन्टी करप्शन ब्यूरो) चौकशीचा ससेमिरा अजून संपलेला नाही. त्यांचे पुत्र शुभम साळवी यांचे व्यावसायिक भागिदार रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिनकर सावंत यांची बुधवारी एसीबी कार्यालयात चौकशी झाली. निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार राजन साळवी यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांच्या व्यवसायात भागिदार असणाऱ्यांची आता चौकशा सुरू झाल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दिनकर सावंत हे २२ जानेवारी रोजी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर संबंधित बांधकाम साईट आहे. एसीबीने. जी नोटीस पाठवली आहे, त्यात ‘या’ साईटचा उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत एसीबीने चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याचा एसीबीने जबाब नोंदवला होता. आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर उर्फ दिनू सावंत यांची चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सावंत यांनी एसीबीची नोटीस स्विकारली होती. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. शुभम साळवी यांनी दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची चौकशी झाली. दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणून असताना टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता दिनकर सावंत हे एससीबी कार्यालयात दाखल झाले. एसीबीने दिलेल्या नोटीसमध्ये साळवी कुटुंबियांविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख आहे. राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी आणि मुलगा शुभम राजन साळवी यांच्याविरुद्ध १८ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १३(१) (ब) सह १३ (२) व कलम १२ प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular