26.5 C
Ratnagiri
Saturday, July 26, 2025

ठाकरे नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीचे काम...

मार्लेश्वर तिठा येथे केबलसाठी पुन्हा खोदाई

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वरतिठा येथे ऐन...

फत्तेगडावरील भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान, संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

गेले चार दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील...
HomeRajapurराजापूरमध्ये एसटी बस, दुधाच्या टँकरमध्ये अपघात

राजापूरमध्ये एसटी बस, दुधाच्या टँकरमध्ये अपघात

गाडीला अपघात झाला त्यावेळी चालक ४० वाहकासह गाडीत प्रवासी होते.

ओणी पाचल मार्गावर पाचलकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली-रत्नागिरी एसटी बस व दूध वाहतूक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एसटी वाहकासह एक विद्यार्थी व टेम्पोचालक व क्लिनर असे ४ जण किरकोळ जखमी झाले. एसटी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या दरम्यान सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर हा अपघात झाला. याठिकाणी चढावाला असलेल्या एसटी बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेनंतर हा आयशर टेम्पोही रस्त्याच्या बाजूला कोसळला. तर एसटी बसही रस्त्याच्या बाजूला कलंडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताविषयी अधिक वृत्त असे की, राजापूर आगाराची आजिवली-रत्नागिरी ही बस घेऊन चालक आर.एच. देशमुख व वाहक विजय शिंदेदेसाई हे आजिवलीकडून पाचलमार्गे रत्नागिरीकडे जात होते.

गाडीला अपघात झाला त्यावेळी चालक ४० वाहकासह गाडीत प्रवासी होते. गाडी सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर चढावात असताना समोरून दुधाने भरलेला आयशर टेम्पो भरधाव वेगाने आला. यावेळी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. व पुढे जाऊन हा टेम्पो रस्त्याच्या बाजूला कोसळला. तर टेम्पोची जोरदार धडक बसल्याने एसटी बसही रस्त्याच्या साईडपट्टीच्या खाली कलंडली. एसटी बस चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रवाशांनी सांगितले. या अपघातामुळे घाबरलेल्या एसटी बसमधील प्रवाशांनी मागील सुरक्षिततेसाठी असलेला दरवाजा उघडून एसटी बस बाहेर उड्या घेतल्या. आर.एच. देशमुख या अपघातात एसटी चालक तसेच अथर्व लिंगायत हा विद्यार्थी असे दोन जण किरकोळ जखमी झाले.

तर टेम्पो चालक बाळाप्पा रामचंद्र हागित याच्यासह त्याचा क्लिनरही किरकोळ जखमी झाले. या जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. एसटी बसमधील किरकोळ जखमी विद्यार्थ्याला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर आगारप्रमुख अजित घोसार्डे, कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे, स्थानकप्रमुख कदम हे आपल्या टिमसह घटनास्थळी पोहचले. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादवही आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बसबाहेर काढून जखमींवर उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले. तर अन्य प्रवाशांना दुसऱ्या पर्यायी बसने रवाना करण्यात आले. याप्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular