26.6 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे 'प्रती...

महानगर कंपनी’वर कारवाईचे संकेत…

महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा...

रत्नागिरी न.प.च्या पहिल्याच सभेत सत्ताधारी नगरसेवक आक्रमक

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच...
HomeMaharashtraना. अजित पवारांचे अपघाती निधन ! महाराष्ट्र सुन्न।

ना. अजित पवारांचे अपघाती निधन ! महाराष्ट्र सुन्न।

अवघ्या २६ सेकंदात सारा खेळ खल्लास झाला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी एका विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी सकाळीच आलेल्या या बातमीने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. अजितदांदाना मुंबईहून बारामतीला घेवून येणारे एका खाजगी कंपनीच्या विमानात ते बारामती एअरपोर्टवर लॅन्ड होत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटचे नियंत्रण सुटले आणि एअरपोर्टपासून काही अंतरावर जावून कोसळले. हे विमान कोसळताच क्षणार्धात मोठा आवाज झाला आणि आग लागली. या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकुण ५ जणांचा मृत्यू ओढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळत असून राज्य शासनाने ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून एका खाजगी विमानाने बारामती येथे येत होते. त्यांच्या बारामती आणि परिसरात बुधवारी एकूण ४ सभा होणार होत्या. नेहमीप्रमाणे संकाळी कामाची लवकर सुरूवात करणारे अजितदादा सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास या विमानाने बारामती एअरपोर्टवर लॅन्ड होत असताना अचानक भीषण अपघात झाला.

विमानात कोण कोण होते ? – अजितदादांसह या विमानात ५ जण होते. त्यामध्ये अजित पवार यांचा सुरक्षा रक्षक आणि खाजगी सचिव विदिप जाधव, विमानाचा पायलट सुमित कपुर, सहाय्यक पायलट डॉ. शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंन्ट जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून एका खाजगी विमानाने बारामती येथे येत होते. त्यांच्या बारामती आणि परिसरात बुधवारी एकूण ४ सभा होणार होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी कामाची लवकर सुरूवात करणारे अजितदादा सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास या विमानाने बारामती एअरपोर्टवर लॅन्ड होत असताना अचानक भीषण अपघात झाला. पिंकी माळी यांचा समावेश होता. आणखी एक सहावी व्यक्ती त्या विमानात होती असे सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत तपशील हाती आलेला नाही. विमान अपघातात वरील ५ ही जणांचा मृत्यू ओढवला.

अचानक ज्वाळा भडकल्या – हा अपघात सिसिटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यानुसार बुधवारी सकाळी ८. वा. ४६ मिनिटांनी हा अपघात झाला आहे. विमान लॅन्ड करण्याचा प्रयत्न पायलट करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ते एअरपोर्टवर लॅन्ड होवू शकले नाही तर एअरपोर्टपासून काही अंतरावर जावून कोसळले. विमान कोसळताच आगीच्या ज्वाळा भडकल्या.

माणस मदतीला धावली – ज्या परिसरात हे विमानतळ आहे, त्या परिसरात फारशी लोकवस्ती नाही. मात्र काही शेतकरी शेतात जात होते. त्यांनी हा अपघात पाहिला. अजित पवारांच्या स्वागतासाठी जी काही कार्यकर्ता मंडळी बारामती एअरपोर्टवर आली होती त्यांनी देखील दुर्घटना पाहिली. सर्वांनी मदतीसाठी धाव देखील घेतली. मात्र स्फोट इतका भयानक होता आणि त्यानंतर उसळलेल्या आगीच्या ज्वाळांनी कोणीच पुढे जावू शकले नाही. काही क्षणांत सर्व काही संपले अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

व्हिडीओ समोर – विमानाच्या दुर्घटनेची कल्पना करणारा २६ सेकंदाचा व्हिडीओ समोर आला असून विमान जमिनीवर कोसळताच आगीच्याज्वाळाउसळताना त्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहेत. आगीची धग आजुबाजूच्या झाडांनाही बसली आहे. ८ वाजून ४६ मिनिटांनी हा भीषण अपघात घडला आणि त्यामध्ये ५ ही जण मृत्यू पावले. आगीत होरपळून या सर्वांचा मृत्यू ओढवला. एअरपोर्टच्या समोरील चौकात लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील हा अपघात कैद झाला आहे.

अवघ्या २६ सेकंदात खेळ खल्लास – मदतीला अनेकांना जायचे होते. मात्र उसळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि त्यांनंतर झालेल्या स्फोटामुळे विमानापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. अवघ्या २६ सेकंदात सारा खेळ खल्लास झाला. सकाळी ८ वा. ४६ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. काही वेळानंतर सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

जळालेले मृतदेह – ५ ही जण फार गंभीररित्या होरपळले होते. काळजावर दगड ठेवत शोकाकुल कार्यकर्त्यांनी सुरक्षा दलाच्या मदतीने सर्व मृतदेह एकत्र केले आणि बारामती येथील अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणले. मृतदेह जळालेले होते. ओळख पटणे कठीण होते.

घड्याळ आणि गॉगल – अजित पवारांच्या हातावर असलेले घडयाळ आणि ते वापरत असलेला गॉगल जळालेल्या अवस्थेत आढळला. यामुळे अजितदादांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर हळूहळू अन्य चौघांचीही ओळख पटली.

अवघा महाराष्ट्र सुन्न – सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या – सुमारास झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त हळूहळू साऱ्या राज्यात पसरले. अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला. सारा महाराष्ट्र सुन्न झाला. सुरूवातीला अजितदादा गेले यावर कुणाचाही विश्वासच बसत नव्हता. हळूहळू वस्तुस्थिती स्पष्ट झाली आणि सारा म हाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांचे चाहते बारामतीच्या दिशेने निघाले.

३ दिवसांचा दुखवटा – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्यादेखील अजितदादांप्रमाणेच बुधवारी प्रचारासाठी सभा होणार होत्या. फडणवीस कोकणात तर शिंदे उत्तर महाराष्ट्रात सभा घेणार होते. या दोन्ही नेत्यांनी आपले सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले. अन्य नेत्यांनीही आपले कार्यक्रम रद्द केले असून मुख्यमंत्र्यांनी राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे. गुरूवारी सरकारी इतमामात अजितदादांच्या पार्थिवावर बारामती या त्यांच्या कर्मभुमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसभेत आदरांजली – दरम्यान सकाळी अपघाताचे वृत्त कळल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, विरोधीपक्षनेते राहुल गांधी आदी नेत्यांनी आपल्या शोकभावना प्रकट केल्या आहेत. अजित पवार हे १० व्या लोकसभेचे सदस्य होते. बुधवारपासून संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले. सभागृहात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी अजितदादांच्या निधनानंतर शोक प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

कुटुंबियं बारामतीकडे – संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने अजितदादांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार, शरद पवारांच्या कन्या आणि अजितदादांच्या भगिनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि अन्य कुटुंबिय दिल्लीत होते. त्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. शरद पवार हे मुंबईत नियमित तपासणीसाठी ब्रिचकॅन्ड्री रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना तेथे वृत्त समजताच ते देखील बारामतीच्या दिशेने निघाले. त्यांच्यांसमवेत त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार देखील होत्या. बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास पवार कुटुंबिय बारामतीत पोहोचले. सौ. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांना घेवून जेव्हा रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा तेथे हजारो कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. रुग्णालयाबाहेर अनेक लोक ढसाढसा रडत होती. कुटुंबियांनाही अश्रू आवरणे अशक्य झाले.

बारामतीकडे रीघ – अजित पवार यांच्या या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून अजित पवारांच्या सहकाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण जात होते. बारामती आणि बीडमध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला. साऱ्या महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते अजितदादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीच्या दिशेने निघाले आहेत. गुरूवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्यासह महाराष्ट्र मंत्रीमंडळातील सर्व सदस्य आणि अन्य राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

ब्लॅक बॉक्स सापडला – अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. विमान अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरु असून महत्त्वाचा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फॉरेन्सीक टिमकडे तो सुपूर्द करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण ब्लॅक बॉक्सच्या तपासणीअंती पुढे येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular