23.2 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeChiplunभोस्ते घाटात अपघातांचे सत्र कायम...

भोस्ते घाटात अपघातांचे सत्र कायम…

गेल्या ६ महिन्यात ३५ हून अधिक अपघात होऊनही प्रशासन सुस्त आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातून प्रवास सुस्साट झाला असला तरी घाटातील वळण अपघातांच्यादृष्टीने शापित बनले आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहनांना घडणाऱ्या अपघातांचे सत्र सुरू असतानाही प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. गेल्या ६ महिन्यात ३५ हून अधिक अपघात होऊनही प्रशासन सुस्त आहे. चौपदरीकरणादरम्यान भोस्ते घाटाला प्राधान्यक्रम देण्यात आला. चौपदरीकरणानंतर घाटातील अवघड वळणाला लागलेला शापितचा “कलंक” पुसला जाईल, अशी बांधण्यात आलेली अटकळ आजमितीस फोल ठरली आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांना “ब्रेक” लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत.

घाटातील संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेले टायर, वळणाच्या भागात बसवण्यात आलेले १६हून अधिक गतिरोधक या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. भोस्ते घाट उतरत असताना अवजड वाहतुकीच्या वाहनांवरील चालकाचा ताबा सुटून थेट वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळत आहेत. यामुळे संरक्षक भिंतीची मोडतोड होत आहे. यासाठीचे सारे उपाय फोल ठरत असताना दुसरीकडे याच वळणावर अपघातांचा धोका कायम राहिला. रस्त्यातच वाहनांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्रदेखील कायमच आहे. वाहने तेथेच उभी करून वाहनचालक काढता पाय घेत असल्याने बऱ्याचवेळा पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना अंदाजच येत नसल्याने अपघात घडत आहेत. गेल्या ६ महिन्यात दुचाकीस्वारांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे. अवजड वाहनांना विशेषतः रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरचे अपघातही पोलिस यंत्रणेसाठी डोकेदुखीच ठरली आहे. आणखी किती दिवस घाटातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करायचे, असे सवालही उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular