27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraएवढे जवळचे असुन सुद्धा ...अस कराल !! – आदित्य ठाकरे

एवढे जवळचे असुन सुद्धा …अस कराल !! – आदित्य ठाकरे

सुर्वे समोर येताच 'त्या दिवशी जेवणाचं ताट वाट पाहत होत, तुम्ही हे काय केलं?' असा सवाल उपस्थित केला.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यानंतर सभागृहात आरोप प्रत्यारोप करण्यात आले.दरम्यान, हे मतदान झाल्यानंतर काही शिवसेना आमदारांसह आदित्य ठाकरे सभागृहातून उठून निघून गेले.

काल आदित्य ठाकरे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे समोर उभे ठाकले. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभेतील शिवसेनेचे आमदार आहेत. सुर्वे समोर येताच ‘त्या दिवशी जेवणाचं ताट वाट पाहत होत, तुम्ही हे काय केलं?’ असा सवाल उपस्थित केला. मात्र, सुर्वे हे निशब्द झाले. काय सांगणार मतदार संघाला?  असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. एवढे जवळचे असुन सुद्धा …अस कराल याची खरचं अपेक्षा नव्हती. अशी खंत आदित्य यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच त्या दिवशी जेवण ठेवलं होत. जेवणाचं ताट वाट पाहत होत, तुम्ही हे काय केलं असा सवाल उपस्थित करत माझ तुमच्यावर खरोखर प्रेम होत. हे तुम्हाला पण माहिती आहे. ठिक आहे बघा आता विचार करा. पण मला स्वतःला दुःख झालं. हे तुम्हाला पण माहितीय. अशा शब्दात मनातील भावना आदित्य यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, या सर्वांवर सुर्वे यांनी निशब्द राहणेच पसंद केले. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले.

शिंदे गटासोबत बंड पुकारणाऱ्या ४० आमदारांपैकी ते एक आहेत. विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular