शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे २३ आणि २४ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून कोकणवासीयांशी त्याच्या खळ्यात म्हणजेच अंगणात बसून संवाद साधणार आहेत. रत्नागिरीमध्ये २३ नोव्हेंबरला सांयकाळी ७.३० वा. करबुडे फाट्यावरील विनोद शितप यांच्या खळ्यात बैठक आयोजित करण्यात आली असुन त्या बैठकीत आदित्य ठाकरे गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गावकऱ्यांना ते भेटणार असून गावकऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेणार आहेत. त्यांच्या ग्रामसंवादाला कसा प्रतिसाद लाभतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांमध्ये उत्साह – करबूडे जि.प. गटात ते ग्राम स्थांशी संवाद साधणार असल्याने न स्थानिक शिवसैनिकांमध्ये उत्साहाची लाट संचारली आहे. त्यांच्या कार्यक्रम ाची जय्यत तयारी सुरु झाली असून जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने हे या गटाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनी तयारीकडे विषेश लक्ष देत आहेत. तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
राजापुरात खळे बैठक – दरम्यान त्याआधी गुरुवारी २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५वा. आमदार आदित्य ठाकरे यांचे राजापूरमध्ये आगमन होणार असून प्रफुल्ल लांजेकर यांच्या घरी बैठक होणार आहे. त्यानंतर ते करबुडे फाट्यावर खळे बैठकीसाठी पोहोचतील. तेथे विनोद शितप यांच्या अंगणात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते मुक्काम करणार आहेत.
शुक्रवारी चिपळूण, खेडमध्ये बैठका – शुक्रवारी २४ नोव्हेंबरला दुपारी १२.१५वा. ते शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुक सचिन कदम यांच्या घरी भेट देतील. त्यानंतर दुपारी १२.२५वा. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी भेट देणार आहेत. तेथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूणातील बैठक आटपून आमदार खेडकडे रवाना होतील. माजी आमदार संजय कदम यांच्या चिंचघर गावी खळे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दिड वाजता ही बैठक होईल. त्यानंतर ते महाडला रवाना होतील.