27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeMaharashtra“ते” बंडखोर शिवसेनेच्या इतिहासात कायम गद्दार म्हणूनच राहतील

“ते” बंडखोर शिवसेनेच्या इतिहासात कायम गद्दार म्हणूनच राहतील

कोकण दौऱ्यानंतर  सोमवारी त्यांनी आजरा, कोल्हापूर व जयसिंगपूर येथे जाहीर सभा घेत बंडखोर आमदार व खासदारांचा चांगलाच समाचार घेतला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील सभेत माणुसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात आलेले नवीन सरकार हे बेकायदेशीर, बेईमानी आणि गद्दारांचे असून, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. कोकण दौऱ्यानंतर  सोमवारी त्यांनी आजरा, कोल्हापूर व जयसिंगपूर येथे जाहीर सभा घेत बंडखोर आमदार व खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे रिमझिम पावसात झालेल्या सभेत त्यांनी व्यासपीठाऐवजी कार्यकर्त्यांच्या गर्दीत येऊन सर्वांशी संवाद साधला. दरम्यान, या वेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील उपस्थित होते. या सभेत सीमा भागातील अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले कि,  ‘ज्यांना आम्ही गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा अधिक प्रेम दिले, विश्वास दिला; त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्या ४० आमदार आणि १२ खासदारांची ओळख ही शिवसेनेच्या इतिहासात कायम गद्दार म्हणूनच राहतील. आम्ही राजकारण न करता समाजकारण करत बसल्यानेच त्यांनी आमच्या विरोधात खेळी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना हे गद्दार आमदार, खासदार विकत घेत होते, रुग्णालयातील आजारी माणसाला विश्वास देण्याऐवजी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा विश्वासघात केला,  याचे फार वाईट वाटते.’

देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही, असा सवाल करताना ठाकरे म्हणाले,  आमची लढाई ही सत्ता आणि सत्य यांच्यात सुरू आहे. राज्यात आतापर्यंत अनेक राज्यपाल पाहिले;  मात्र सध्यासारखे राजकीय राज्यपाल पाहिले नाही. जे मुंबईतील मराठी माणसाला कमी लेखतात,  मराठी माणसाला आणि शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर टीका करतात.’

RELATED ARTICLES

Most Popular