औद्योगिक प्रशिक्षण मुलींची रत्नागिरी येथे प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू करण्यात आला असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलै पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची रत्नागिरी येथे कॉसम ‘टॉलॉजी, फ्रट्स अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स हे व्यवसाय शिकविले जातात. यामध्ये ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी करीता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण तसेच इतर सर्व व्यवसायांकरिता दहावी उत्तीर्ण पात्रता आहे.
व्यवसायाचा कालावधी इंफॉरमेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स या व्यवसायाकरीता दोन वर्षाचा असून इतर सर्व व्यवसायांकरीता एक वर्षाचा कालावधी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती मुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेशासंबंधी माहितीकरिता आर. डी. जानवेकर, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची रत्नागिरी (मोबाईल क्रमांक ८७७९७७४६९३) यांच्याशी संपर्क साधावा.