27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokanकोकण आयडॉल पुरस्कारासाठी ऍड.ओवेस पेचकर यांची निवड

कोकण आयडॉल पुरस्कारासाठी ऍड.ओवेस पेचकर यांची निवड

ग्लोबल कोकणचे प्रमुख कार्यवाह व कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी ऍड. पेचकर यांची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात आली त्याबद्दल सांगितले.

एखाद्याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल, कर्तुत्वाबद्दल झालेलं कौतुक नक्कीच अपेक्षित असत. कोकणामध्ये अनेक व्यक्ती अशा आहेत ज्यांच कर्तुत्व खूप मोठे आहे. अनेक उद्योजक आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. नवनवीन संशोधन करून आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी केली आहे. अशाच सर्वांसाठी ग्लोबल कोकणच्यावतीने यावर्षी प्रथमच कोकण आयडॉल हा भव्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. आणि कोकण आयडॉल उद्योग भूषण पुरस्कार ऍड. पेचकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत या सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कर्तृत्वाने आपले उद्योग देशभर आणि जगभरात विकसित करणारे कोकणातील उद्योजक आणि व्यावसायिक ब्रँड यांना कोकण आयडॉल उद्योग भूषण या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय नवीन आणि युनिक संकल्पना कोकणात यशस्वीपणे राबविणारे युवा उद्योजक यांना कोकण आयडॉल युवा उद्योग भूषण या पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी माहिती ग्लोबल कोकणचे प्रमुख कार्यवाह आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.

चिपळूण येथील मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर कोकणवासियांचे मुलभूत प्रश्‍न न्यायालयासमोर ठेवून कोकणाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे कोकणातील पायाभूत सुविधा, मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक आणि इतर प्रश्‍नांना न्याय मिळेल, असा कोकणवासियांचा विश्‍वास आहे.

ग्लोबल कोकणचे प्रमुख कार्यवाह व कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी ऍड. पेचकर यांची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात आली त्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, वकील आणि कायदे क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीमत्व आहात, आपण सामाजिक जाणीवेतून कोकणसाठी न्यायालयीन लढाई लढत आहात हे कार्य कोकणातील नव्या पिढीला आणि कोकणवासियांना नक्कीच प्रेरणादाई ठरणारे आहे. यासाठी कोकण आयडॉल उद्योग भूषण या महत्वपूर्ण पुरस्कारासाठी ऍड. पेचकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular