29.3 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...

चिपळूणमध्ये नव्या इमारतीसाठी आराखडा, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया

चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही...

आरे-वारे किनारी वाहने नेणाऱ्यांना रोका…

काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहने...
HomeInternationalअफगाणी युवा फुटबॉलपटूचा अपघाती मृत्यू

अफगाणी युवा फुटबॉलपटूचा अपघाती मृत्यू

राष्ट्रीय युवा संघासाठी खेळणारा अफगाण फुटबॉलपटू काबुल विमानतळावरून विमान उड्डाणानंतर त्यातून पडून ठार झाला, असे स्पोर्ट्स फेडरेशनने गुरुवारी स्पष्ट केले आहे. काबुलमध्ये अमेरिकन विमानाच्या चाकांवर चढून बसलेल्या काही लोकांचा व्हिडिओ सोमवारी प्रदर्शित झालेला आणि उड्डाणानंतर त्यामधील काही हवेतून खाली पडताना दिसले. आकाशातून पडून मृत्यू झालेल्यांमध्ये झाकी अनवरी हा तरुण फुटबॉलपटूचा समावेश होता.

अफगाणिस्तानमधील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी संस्था जनरल डायरेक्टरेट ऑफ फिजिकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स ऑफ अफगाणिस्तानने गुरुवारी झाकी अनवरीच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली आहे. संस्थेने आपल्या ऑफिशीअल फेसबुक पेजवर लिहिले आहे कि, तालिबान्यांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर हजारो लोकांनी जीव वाचविण्याच्या भीतीने आहे त्या परिस्थितीत देश सोडला आहे आणि अजूनही बरेच जण तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर हजारो तरुणांप्रमाणेच अनवरी यालाही देश सोडायचा होता, पण अमेरिकन विमानातून पडून त्याचा मृत्यू झाला.

जेव्हा काबुल विमानतळावरून लोक विमानात चढण्याचा प्रयत्न करत असताना धक्काबुक्की करताना दिसले. काही लोक विमानाच्या चाकावर आणि त्याच्या पंखांवर बसलेले निदर्शनास आले, तर काही लोक अमेरिकन विमान आपल्या लोकांसह उड्डाण करण्यासाठी रनवे सोडत असताना, अजूनही विमानाच्या मागे धावताना दिसत होते.

अमेरिकेतील विमान बोइंग सी-17 मधून पडून आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. झाकी अनवारी हा अफगाणिस्तानचा युवा फुटबॉलर होता. विमानात बसण्यासाठी एकच गोंधळ उडाल्याने, तालिबानी लोकांच्या भितीने अनेकजण विमानाच्या चाकांवर बसले. यावेळी विमानावर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये झाकीचा देखील समावेश होता.

RELATED ARTICLES

Most Popular