पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या चिपळूणमधील १८०० शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले आहेत. त्यांना नव्याने अर्ज करण्याचे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हत्रे यांनी केले आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार, वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तसेच पीएम किसान नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधारकार्डही जोडावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्याला तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तसेच आता महाराष्ट्र शासनाने नमो सन्मान योजना लागू केली आहे. राज्य सरकारकडून ही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळत आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षावरील मुलाला लाभ घेता येतो; पण काही पती-पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत.
अशी बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यामध्ये आता लाभार्थीचे निधन झाले असेल तरच वारसाहक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र झालेल्या २५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. १८०० शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज केले होते; मात्र शासनाने नवीन नियम केल्यानंतर त्यांचे अर्ज रद्द करून त्यांना नव्याने अर्ज करण्याची सूचना केली आहे.
लाभाच्या निकषात बदल – शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी पैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षांवरील मुलाला या योजनेचा लाभ घेता येतो; पण काही पती-पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे, म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत, अशी बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यात बदल केले आहेत. आता लाभार्थीचे निधन झालेले असल्यास वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.