27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeIndiaअखेर दोन वर्षानंतर हापूसची अमेरिका वारी, मिळाली परवानगी

अखेर दोन वर्षानंतर हापूसची अमेरिका वारी, मिळाली परवानगी

दरवर्षी देशातून जवळपास १ हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो.

मागील महिन्यात अनेक संकटावर मात करत फळांचा राजा हापुस मुंबई बाजारपेठेत दाखल झाला होता. देशाअंतर्गत बाजारपेठेत तर निर्यातीचा मार्ग खुला झाला होता. कोरोनामुळे परदेशातील खवय्ये गेल्या दोन वर्षापासून हापूस आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले आहेत. आंबा निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची परवानगी गरजेची असते. मात्र, कोरानामुळे निर्यातीला परवानगीच मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासून इच्छा असून देखील हापूसचा आस्वाद घेता आलेला नाही.

त्यामुळे दोन वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर फळांचा राजा हापूस निघाला अमेरिका वारीवर. आता अमेरिकेत निर्याती संबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून, अमेरिकेतील ग्राहकांना दोन वर्षानंतर हापूसची चव चाखायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे देशातील मुख्य बाजारपेठेतील ग्राहक हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात अशीच स्थिती अमेरिकेतही असते पण कोरोनाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे निर्यात ही रोखण्यात आली होती. अखेर अमेरिकेतील कृषी विभागाने आयातीस परवानगी दिल्याने निर्यातीचा मार्ग खुला झाला असल्याचे आंबा बागायत संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्ष नैसर्गिक आपत्ती आणि निसर्गाच्या बदलत्या वातावरणातील लहरीपणामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण आता बाजारपेठेतील दर आणि निर्यातीला मिळालेली परवानगी यामुळे परकीय चलनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. वाढत्या मागणीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालेली असल्याने , अखेर केंद्र सरकारने आंब्याच्या विक्रीसाठी हस्तक्षेप केल्याने निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरवर्षी देशातून जवळपास १ हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो. यामध्ये ३०० टन प्रमाणात हापूस आंब्याचीच विक्री जास्त असते. मात्र,  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परस्थितीमुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार या भागातील आंबा निर्यात ही बंद झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular