रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साळवी स्टोप येथे असणारा जलतरण तलाव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सुमारे दोन वर्षापासून बंद ठेवण्यात आला होता. तो आता अटी आणि शर्थीवर सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अटी आणि शर्थीमध्ये १८ वर्षावरील खेळाडू आणि व्यवस्थापन कर्मचारी वृंद यांच्या लसीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षाखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण उपलब्ध नसल्याने त्यांच्या विशेष अति म्हणजे पालकांचे संमत्तीपत्र, वयाचा पुरावा, आधारकार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक असणार आहे. या सर्व अटींचे पालन करून जिल्हाधिकारी यांनी जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या रत्नागिरीमधील अती प्रादुर्भावामुळे बंद असणारे जलतरण तलाव आता नव्या आदेशामुळे सुरु होण्याची चिन्ह दिसत असून, जिल्हा प्रशासनाकडून जलतरण तलावासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना व अटींसह ही परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरीतील कोरोनाची दुसरी लाट आत्ता ओसरत चालली असली तरी, अजून ती पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे अशा शिकाणी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
विविध स्तरावरील जलतरण स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी मागील सुमारे दोन वर्षापासून बंद असणारा जलतरण तलाव आता अटी आणि शर्थीवर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला नक्कीच वेग प्राप्त होणार आहे.