27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeMaharashtra४ तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

४ तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

राज ठाकरे म्हणाले, लाउडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा काही धार्मिक विषय नाही.

औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या सभेत बोलताना ते म्हणाले आहेत की, मशिदींवर लाउडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करू, मोठ्याने वाचू, असं ते पुन्हा एकदा म्हणाले आहेत.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मला कुठेही जातीय तेढ निर्माण करायची किंवा दंगल घडवायची नाही. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.” ते म्हणाले, ”त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला असताना एक पत्रकार आले, ते मुस्लिम समाजातले होते. ते माझ्या कॅबिनमध्ये आले, ते म्हणाले साहेब मी मुसलमान आहे. मात्र आम्हाला सुद्धा भोंग्यांचा खूप त्रास होतो. माझा लहान मुलगा लाउडस्पीकर लागला की झोपतच नाही. झोप त्याची पूर्ण होत नसल्याने तो आजारी पडायला लागला आहे. त्यानंतर मी त्या मशिदीत जाऊन मौलवींना भेटलो आणि म्हणालो, भोंग्यांमुळे माझ्या मुलाला झोप येत नाही,  त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला.”

राज ठाकरे म्हणाले, लाउडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा काही धार्मिक विषय नाही. जर तुम्ही या विषयाला धार्मिक वळण देणार असाल तर त्याच उत्तर देखील आम्ही धर्मानेच देऊ. आमची इच्छा नसताना देखील विनाकारण आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधील शांतता आम्हाला भंग करायची नाही. तशी आमची इच्छा देखील नाही, असं ते म्हणाले आहेत.

राज ठाकरे पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशात जर लाउडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का उतरवले जाऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ते म्हणाले, ”सर्व लाउडस्पीकर अनधिकृत आहेत. ‘रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता, कोणी अधिकार दिले तुम्हाला,  असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले, माझी शासनाला विनंती आहे.  तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र ४ तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ४ तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular