अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात. असं म्हणत रामदास कदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद चालू असतानाच रामदास कदमांचीही जीभ घसरली.
शिवसेना नेत्यांवर त्यांनी अर्वाच्च भाषेत टीका केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी राज्यात अजून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात. असं म्हणत रामदास कदमांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. यावेळी त्यांनी परब यांच्यासह सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचाही उल्लेख केला.
सुभाष देसाई हा कान चावणारा आणि कानात बोलणारा माणूस आहे. जोपर्यंत हे नेते उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचं काहीही खरं नाही. अशा शिवराळ भाषेमध्ये रामदास कदम यांनी सेना नेत्यांवर टीका केली आहे. तसेच, परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला अजून उलगडत नाही. अनिल परबांनी सर्वात जास्त अन्याय माझ्या मुलावर केला आहे.
दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं. असा सनसनाटी आरोपही कदम यांनी सेना नेत्यांवर केला.