लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर विधानसभेला स्वबळावर रोब्यातील २०० ते २२५ जागा लढविण्याची घोषणा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. सोलापूर, मराठवाडा, विदर्भ दौरा करताना पक्षाचे सात उमेदवार राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. यात बाळा नोक्षगावकर (शिवडी), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नगरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली), सन्दीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), आणि राजू उंबरकर (वणी) आदी उमेदवारांचा समावेश आहे. सौत्र मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचे नाव आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमित ठाकरे निवडणूक लढविण्याबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. मात्र त्यांना मतदारसंघ कोणता देण्यात येईल, याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते.
शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अमित ठाकरे निवडणूक लढविणार, अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र घरातच लढत नको, असा विचार करून कदाचित अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभा मतदार संघातून निवडणूक देण्यात आल्याचे बोलले जात आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिल्याने आदित्य ठाकरे यांच्यासमोरील आव्हान बऱ्याच प्रमाणात सोपे केले आहे. तर माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक रिंगणात असले, तरी शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांची ‘व्होट बँक’ सारखीच असल्याने या मतांमध्ये होणारे विभाजन तिसऱ्याच उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते. मागाठाणे (मुंबई) मतदारसंघात नयन कदम यांची उमेदवारी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या फायद्याची ठरणार आहे. तर दहिसर मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा होती.
मात्र त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले नाही. नंतरही त्यांना उमेदवारी न दिल्यास शिवसेनेत (ठाकरे गट) नाराजी राहू शकते. याचा फायदा मनसेचे राजेश येरुणकर यांना होऊ शकतो. शिवडी मतदार संघातून बाळा नांदगावकर हे पुन्हा एकदा मनसेकडून निवडणूक लढविणार आहेत. नांदगावकर यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि त्यांची प्रतिमा याचा फायदा होऊ शकतो. त्यातच त्यांच्यासमोर असलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) अजय चौधरी यांची ही तिसरी टर्म असल्याने, मतदार त्यांना कितपत स्वीकारतात, हे सुद्धा पाहावे लागणार आहे. ठाणे शहरातून मनसेचे अविनाश जाधव हे शिवसेनेचे (ठाकरे गट) राजन विचारे यांच्या समोर चांगलेच आव्हान उभे करू शकतात. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जवळपास ७० हजार मते घेऊन विचारे यांना घाम फोडला होता. मात्र यावेळी या मतदारसंघात भाजप, शिवसेना अशी सर्वच पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे गरजेचे आहे.
मनसेची दुसरी यादी जाहीर – मनसेने बुधवारी उमेदवारांबी दुसरी यादी जाहीर केली. यात पप्पू ऊर्फ मंगेश पाटील (अमरावती), विनकर धर्माजी पाटील (नाशिक पश्चिम), डॉ. नरसिंग भिकाणे (अहमदपूर-चाकूर), अभिजित देशमुख (परळी), सचिन रामू शिंगडा (विक्रमगड), वनिता शशिकांत कथुरे (भिवंडी ग्रामीण), नरेश कोरडा (पालघर) आदी उमेदवारांचा समावेश आहे.