29.8 C
Ratnagiri
Tuesday, May 21, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeMaharashtraराज्यात मद्य विक्रीत वाढ झाल्याने महसुलात भर

राज्यात मद्य विक्रीत वाढ झाल्याने महसुलात भर

महाराष्ट्रात मद्यविक्रीमध्ये मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

कोरोनानंतर सगळं काही पुन्हा एकदा सुरळीत होत असताना लॉकडाउनचा फटका बसलेल्या मद्य व्यवसायालाही उभारी मिळालेली दिसत आहे. महाराष्ट्रात मद्यविक्रीमध्ये मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात आणि त्यातही लॉकडाउनमुळे मद्य व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मागणी असून देखील शासनाच्या नियमामुळे पुरवठा करणे शक्य नव्हते. पण या आर्थिक वर्षात तब्बल १७ हजार १७७ कोटींची दारुची विक्री करण्यात आली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल २ हजार कोटींच्या दरम्यान आहे.

मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपले टार्गेट पूर्ण करता आलेले नाही. विभागासमोर १८ हजार कोटींचं टार्गेट ठेवलेलं होतं. पण हे टार्गेट पूर्ण न होता पाच टक्क्यांनी पाठी राहिलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतीय बनावटीच्या विदेशा दारुसोबतच बिअर,  देशी दारु आणि वाईनच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत बिअरच्या विक्रीत २०२१-२२ मध्ये १४ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. २०१९-२० मध्ये यामध्ये २२ टक्क्यांची घट पहायला मिळाली होती.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आर्थिक वर्षात सर्व काही सुरळीत झालं असून लोकांची मद्य विकत घेण्याची क्षमता वाढली असल्यानं तसंच कोरोनाची दोन वर्षे घरात राहिल्यानंतर पुन्हा मित्रांच्या भेटीगाठी, गेटटूगेदर आणि पार्टी यामुळे ही संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात २०१९-२० मध्ये २ हजार १५७ लाख लीटर दारुविक्री झाली. पण करोनाचा फटका बसल्यानंतर २०२०-२१ मध्ये हा आकडा १ हजार ९९९ वर आला होता. पण पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली असून २०२१-२२ मध्ये २३५८ वर पोहोचला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular