24 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeIndiaअपघातग्रस्त व्यक्तीस वाचविणाऱ्या जीवनदूतास प्रोत्साहनपर ५ हजार रुपये बक्षीस

अपघातग्रस्त व्यक्तीस वाचविणाऱ्या जीवनदूतास प्रोत्साहनपर ५ हजार रुपये बक्षीस

अपघातग्रस्त व्यक्तीना वेळ न घालवता, ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे हि एक प्रकारची मदत जीवनदूताकडून होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक वेळा रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळीच मदत मिळाली नाही तर मृत्यू ओढवतो. आणि त्यामध्ये बरेचदा असे घडते कि, मदत करणाऱ्यांच्या पाठी पोलिसांच्या चौकशीचा पाठपुरावा सुरु होतो. त्यामुळे इतर कोणी मदतीसाठी पुढे यायला धजत नाही. जखमीला योग्य वेळेमध्ये मदत मिळाली तर त्याचा जीव वाचण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत रस्ते अपघातातील अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ मदत करुन त्याचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जीवनदूतास प्रोत्साहनपर ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येते, अशी माहिती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रस्ते अपघातातील अपघातग्रस्त व्यक्तीस गंभीर इजा झाली असल्यास अशा व्यक्तीस तात्काळ आहे त्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान मिळू शकते. त्यामुळे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने अपघातग्रस्तास तात्काळ मदत करणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेची माहिती https://morth.nic.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे.

रस्त्यावर घडणाऱ्या अपघातामध्ये मेंदूला मार लागणे, अति रस्तस्त्राव होणे, पाठीच्या कण्याला मार बसून मोठी इजा होणे आदी गंभीर इजा झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीना वेळ न घालवता, ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे हि एक प्रकारची मदत जीवनदूताकडून होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जीवनदूताची निवड जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खालील समिती करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर चालू वर्षातील सर्वोत्कृष्ठ जीवनदूताची निवड होणाऱ्यास प्रोत्साहनपर १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular