20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीसह देवरुखमध्ये विठ्ठल मंदिरातील प्रवचन उपक्रमाला सुरुवात

रत्नागिरीसह देवरुखमध्ये विठ्ठल मंदिरातील प्रवचन उपक्रमाला सुरुवात

कोरोना काळाच्या भयावह दोन वर्षांनंतर रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातील प्रवचन उपक्रमाला पुन्हा सुरुवात करण्यात येत असून, रत्नागिरीसह देवरुख येथेही हा उपक्रम सुरु होणार आहे. यामध्ये पहिले प्रवचन हे डॉ. जोत्स्नाताई पाटणकर यांचे होणार आहे.

रत्नागिरीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात नीला पालकर, ज्योत्स्नाताई पाटणकर आणि त्यांच्या काही सहकारी मैत्रिणीनी मिळून हा उपक्रम सुमारे ५ वर्षे चालवला. परंतु, मागील दोन वर्ष कोरोना काळामुळे त्यामध्ये खंड पडला. आता हा उपक्रम रत्नागिरीसह देवरुख येथे नव्याने सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरीत हा उपक्रम ६, ७ आणि ८ डिसेंम्बर या कालावधीमध्ये संध्याकाळी ५ ते ६ वाजता होणार आहे. तसेच देवरुख विठ्ठल मंदिर, मधली आळी येथे हा उपक्रम ३, ४ आणि ५ डिसेंबरला ६ ते ७ या वेळेमध्ये होणार आहे.

डॉ. जोत्स्ना ताई पाटणकर या यावेळी ‘शंकराचार्यांच प्रातः स्मरण स्तोत्र’ ह्या विषयावर बोलणार आहेत. रत्नागिरीतील पहिल्या रेडिओलॉजिस्ट म्हणून १५ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली आणि त्या अध्यात्माकडे वळल्या. प.पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉ. काका यांचा त्यांनी सन १९८९ मध्ये अनुग्रह घेतला.

सदगुरु डॉ. काका यांच्या मार्गदर्शनाखाली भगवतगीता, ब्रह्मसुत्रे, वेदांत ग्रंथ, उपनिषदे, आद्य शंकराचार्य परंपरेचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. पत्राद्वारे दासबोध अभ्यास आणि समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या आहेत. विविध अध्यात्मिक मासिकात त्यांचे लिखाण सुरू असून त्या अध्यात्मिक मार्गदर्शन सुद्धा करतात. आता त्या समीक्षकाचे काम करतात. डॉ. पाटणकर यांनी यापूर्वीही अशा उपक्रमात प्रवचने दिली आहेत. दोन वर्षानंतर नव्याने सुरू होणाऱ्या प्रवचन उपक्रमात त्यांचे प्रवचन पहिले असून या उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजिका डॉ. निशिगंधा पोंक्षे, सौ.गौरी ढवळे आणि देवरुखच्या सौ. वेदा प्रभुदेसाई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular