27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeInternationalएलॉन मस्क यांची ट्वीटर नंतर अजून एक मोठी घोषणा

एलॉन मस्क यांची ट्वीटर नंतर अजून एक मोठी घोषणा

मस्क यांनी ट्विटरनंतर त्यांचा मोर्चा सर्वांचे आवडते शीत पेय कोका-कोलाकडे वळवला आहे.

मागील आठवड्यामध्ये टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क ट्विटरला विकत घेतल्यानंतर सोशल मीडियावर अधिकच सक्रीय झाले आहेत. त्यांनी आज सकाळच्या सुमारास ट्विट करून अजून एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्विटरनंतर त्यांचा मोर्चा सर्वांचे आवडते शीत पेय कोका-कोलाकडे वळवला आहे. त्यांनी आज सकाळी कोका-कोला विकत घेण्याची जाहीर घोषणा केली आहे.

एलॉन मस्क यांनी असं ट्विट केलं आहे कि, आता मी कोका-कोला विकत घेणार आहे. कारण, त्यामध्ये मला कोकेन टाकता येईल. कोका कोला कंपनीचे सध्याचे सीईओ जेम्स क्विन्सी आहेत. तसेच कंपनीचे मुख्यालय यूएसमधील जॉर्जिया येथे आहे. आता एलॉन मस्क यांनी ही देखील संपूर्ण कंपनी विकत घेण्याची जाहीरपणे घोषणा केली आहे.

दुग्धजन्य पदार्थांची विक्री आणि मार्केटींग करणारी सर्वात मोठी कंपनी अमूल व्यंगचित्रांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विनोदी पद्धतीने भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी अमूलने अनेक मुद्द्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमाने भाष्य केले आहे. आता एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अमूलने देखील एक मजेशीर व्यंगचित्र ट्विट केले आहे.

आधी मस्क यांनी ट्विटरमधील केवळ ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. यामुळे ते या कंपनीचे सर्वांत मोठे भागधारक बनले होते. परंतु, त्यानंतर मस्क यांनी ट्विटर पूर्णपणे खरेदी करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. १४ एप्रिल २०२२ रोजी ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. अखेर ट्विटरच्या संचालक मंडळाने मस्क यांनी दिलेल्या ४४ अब्ज डॉलरच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सोशल मीडियातील या सर्वांत मोठ्या कंपनीची मालकी जगातील सर्वांत धनाढ्य उद्योगपतीकडे आली असल्याची घोषणा कंपनीने केली.

RELATED ARTICLES

Most Popular