28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरु…

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम...

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeRatnagiriप्रशासनाने कडक पावले न उचलल्यास आंदोलन - विश्व हिंदू परिषद

प्रशासनाने कडक पावले न उचलल्यास आंदोलन – विश्व हिंदू परिषद

आम्ही गो मातेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत.

रत्नागिरी गोवंश हत्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. गेली अनेक वर्षे गो मातेचे पूजन, संगोपन आणि गोमातेचे महत्त्व सर्वांना समजावून देणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने गो वंश हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. याप्रकरणी सकल हिंदू समाजाला पाठिंबा असून, प्रशासन, पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाची भूमिका ठरवू, अशी माहिती आज विश्व हिंदू परिषदेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. व्यंकटेश हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कुमार जोगळेकर, उपाध्यक्ष उमा देवळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विराज चव्हाण, गोरक्षा संयोजक विशाल पटेल, मातृशक्ती संयोजिका अस्मिता सरदेसाई आदी उपस्थित होत्या.

या वेळी श्री. जोगळेकर म्हणाले, ‘गो माता ही समस्त भारतीयांची माता आहे. तीच आपले पोषण करते. ती देवरूप आहे. त्यामुळे तिची हत्या आम्ही खपवून घेणार नाही. यापूर्वी पोलिसांना, जिल्हा प्रशासनाला हिंदुत्ववादी संघटनांनी गो हत्याविरोधात पावले उचलण्याबाबत निवेदने दिली आहेत, परंतु रत्नागिरी एमआयडीसी भागात घडलेल्या गो हत्या प्रकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रत्नागिरीसारख्या शांत शहरात असे प्रकार निंदनीय असून प्रशासन, पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर शिक्षा द्यावी.

या प्रसंगी विशाल पटेल म्हणाले, गेले काही महिने रत्नागिरीत गोवंश हत्येचे प्रकार घडल्याचे कानावर येत होते. परंतु एमआयडीसी भागात घडलेल्या घटनेमुळे आम्ही सारे व्यथित झालो आहोत. आम्ही गो मातेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. रत्नागिरीतून गोवंशाची तस्करी थांबवण्यासाठी नाक्यांवर तपासणी व्हावी. तसेच मुर्शी, साखरपा येथील नाक्यावर कडक तपासणी झाली पाहिजे. कारण तिथे अनेकदा अशा तस्करी थांबवण्याचे काम हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

हिंदूंनी एकत्र यावे – गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गो मातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज काम करेल. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे, परंतु ही जमीन महसूल खात्याकडे आहे, काही वाद प्रकरणे सुरू आहेत, असे उत्तर मिळाले आहे, असे विशाल पटेल यांनी सांगितले, परंतु हिंदूंनी एकत्र येऊन याकरिता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular