रत्नागिरी विमानतळाला चालना मिळाली असून टर्मिनल इमारतीच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे. या इमारतीच्या भूमिपूजनासह अन्य विकास कामे व योजनांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच रत्नागिरीत येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. तसेच विमानतळ टर्मिनल इमारतीला शंभर कोटींच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली आहे. या कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्या वयोश्री योजनेसाठी सर्वाधिक नोंदणी रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे.
हा कार्यक्रमही याचवेळी घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीणसाठीही जवळपास अडीच लाखांची नोंद झाली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीत सध्या खड़े प्रकरण गाजत असून, याबर बोलताना ना. सामंत म्हणाले की, मी नगर पालिकेमणून जाऊन स्वतः आढावा घेतला आहे.
रत्नागिरीत मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे खड्ढे भरण्यास अडचण निर्माण होत आहे. पुढील पंधरा दिवसात उर्वरीत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले जाईल. त्याचप्रमाणे खड्डे योग्यप्रकार भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण झाले आहे. त्यात केबलिंग करण्यासाठी काही ठिकाणी पँच ठेवण्यात आले आहेत. केबलिंगचे काम झाल्यानंतर हे पंचही काँक्रीटने भरण्यात येतील. लोकांना त्रास होतोय हे माहिती आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी मी स्वीकारली आहे. भविष्यात खड्ड्यांचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूवना नगर परिषद प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.